Amruta Khanvilkar Dance in Metro: सध्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाणीही गाजत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर हिचीही भूमिका आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृताने (Amruta Khanvilkar) पुणे मेट्रोत 'चंद्रा' या गाण्यावर पुणेकरांबरोबर ठेका धरला. त्याचा व्हिडिओ अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी तिला पुणेकरांनी साथ दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) देखील उपस्थित होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)