कृषी क्षेत्राला (Agriculture Sector) चालना देण्यासाठी आणि शेतीमधील उत्पादन (Farm Production) वाढवण्याच्या दृष्टीने, महिंद्राने (Mahindra) आपल्या 75 वर्षे पूर्ततेच्या निमित्ताने शेतीसाठी डिजिटल सवेरा (Digital Savera), 'Krish-e' सादर केले आहे. महिंद्राचे 'Krish-e' हे आपल्या शेतीचे उत्पादन सुधारण्यात मदत करण्यासाठी एक अनोखे तंत्र आणि अनुभव देणार आहे. सोबतच हे आपल्यासाठी वैयक्तिकृत कॅलेंडर प्रदान करणार आहे. तज्ञांच्या सल्ल्याने आणि स्मार्ट सोल्यूशन्ससह महाराष्ट्रातील शेतीसाठी ‘डिजिटल पहाट’चे रोल आउट आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. शेतीच्या भवितव्यासाठी उपयुक्त अशा 'डिजिटल पहाट'चे, लाईव्ह स्ट्रीमिंग फेसबुक पेजवर पाहता येईल. सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र रोल आउटमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.
महिंद्राद्वारे तयार केलेले 'Krish-e' आपल्या शेतासाठी वैयक्तिकृत कॅलेंडर प्रदान करते. आपला तालुका, पीक, हंगाम, शेत आकार, लागवड साहित्य, पेरणीची तारीख आणि इतर अनेक मापदंडांच्या आधारे प्रत्येक शेतीसाठी कॅलेंडर वैयक्तिकृत केले आहे. शेतकरी बांधवांना अधिक विकसित करण्याची आणि शेतीत परिणामकारक बदल घडवण्याची ही नवी जागृती आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: 4 ऑक्टोबर पर्यंत मुंबई, ठाणे सह कोकण, मध्य महाराष्ट्र भागात गडगडाटासह पावसाची शक्यता)
होणार आहे आज शेतीची डिजिटल पहाट!
खालील लिंक वर क्लिक करा आणि बना ह्याचा भाग:https://t.co/7lq3jgjLro#Farmer #MahindraRise #FutureOfFarmServices #DigitalSavera #DigitalYugInFarming #FutureOfFarming #Risewithkrishe@rajesh664 @hsikka1 @shubho22 @anandmahindra @TractorMahindra pic.twitter.com/3DhuRAo0lg
— Krish-e (@KrisheFarming) October 2, 2020
Krish-e प्रीमियम सेवा:
- विनामूल्य माती चाचणी करून दिली जाईल आणि माती आरोग्य कार्ड दिले जाईल.
- आपले शेत भू-टॅग केले जाईल व आपल्याला सद्य हवामान स्थितीची माहिती प्रदान केली जाईल.
- हवामानाचा अंदाज, माती परीक्षण डेटा आणि इतर गोष्टी स्वतःहून अपडेट होत राहतील.
- शेतीबाबतची कीड व रोगाचा इशारा देण्यात येईल.
- आपल्या विशिष्ट प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तज्ञांसह विनामूल्य सत्रे आयोजित केली जातील.दरम्यान, हे कॅलेंडर आपल्याला आपल्या शेतीसाठी नक्की किती खताची आवश्यकता आहे हे सांगेल, तसेच त्याची अंदाजे किंमत देखील प्रदान करेल. याची सर्व माहिती आपल्या स्थानिक भाषांमध्ये प्रतिमा आणि व्हिडिओंसह उपलब्ध आहे. जमीन कसणे, बियाणे, पेरणी, पीक नियोजन, खत व्यवस्थापन, सिंचन, शेतीचे पोषक व्यवस्थापन, कीटकांपासून संरक्षण, रोग, तण, पीक वाढ आणि कापणी या सर्व कामांचा यामध्ये समावेश आहे.