मुंबई (Mumbai) मध्ये कांदिवली (Kandivali) भागात गटारात 5 कुत्रे मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. ही घटना कांदिवली पश्चिमेला असलेल्या Mangalmayi Building, Sainagar भागातील आहे. कुत्र्यांचे शव, गळा दाबून टाकून दिले होते, असे मानले जाते, स्थानिक रहिवासी हीना लिंबाचिया (50) यांनी सोसायटीचे अध्यक्ष आशिष बुसा यांना या घटनेची माहिती दिली. बुसा यांनी पालिकेच्या कर्मचार्यांना सांगितले.
Mid-Day report, नुसार या भटक्या कुत्र्यांना आजुबाजूच्या भागातील लोकं खायला देत होते. हे कुत्रे एका प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आढळले आहेत. त्यांच्या तोंडाच्या मुसक्या आवळून त्यांना गटारात फेकले होते.
परिसरातील लोकांना या भटक्या कुत्र्यांचाही लळा लागला होता. त्यांचा अशाप्रकारे मृत्यू पाहणं या लोकांसाठी मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे. या अमानुष घटनेमागे कोणी ड्रग्स अॅडिक्ट व्यक्ती असू शकते असा त्यांचा अंदाज आहे. ‘Dognapping’ in Pune: पुण्यात कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय; गुजरवाडीत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी बॉक्सर जातीचा कुत्रा पळवला (Watch Video).
पोलिसांनी तपासामध्ये सीसीटीव्ही फूटेज तपासले आहे. त्यांच्याकडून नेमकं कोणाकडून हा प्रकार गेला आहे याचा तपास सुरू आहे.अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून कुत्रेही रस्त्यावर दिसत नव्हते असे स्थानिकांनी सांगितले आहे.
या घटनेशी संबंधितच सोमवारी, 11 नोव्हेंबर रोजी जवळच्या नाल्यात आणखी दोन कुत्र्यांचे शव आढळून आले. मानवाधिकार आयोग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि पीएएल ॲनिमल फाऊंडेशनचे कायदेशीर सल्लागार रोशन पाठक यांच्या म्हणण्यानुसार, हे संशयास्पद आहे. या परिसरात सुमारे 13 किंवा 14 कुत्रे मारले गेले असतील आणि नाल्यात टाकून दिले असतील. सापडलेले दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.