‘Dognapping’ in Pune: पुण्यात कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय; गुजरवाडीत बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी बॉक्सर जातीचा कुत्रा पळवला (Watch Video)
पुणे-सातारा रोडवरील गुजरवाडी फाटा येथून 50 हजार रुपये किमतीचा बॉक्सर जातीचा कुत्रा मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला.
‘Dognapping’ in Pune: गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पोर्शे कार अपघात, पूजा खेडकर प्रकरण त्यानंतर आता पुण्यात चक्क कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-सातारा रोडवरील गुजरवाडी फाटा येथून 50 हजार रुपये किमतीचा बॉक्सर जातीचा कुत्रा मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला. मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गुजरवाडी येथील 35 वर्षीय रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा कुत्रा पळवून नेला. ही चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीच्या प्रत्युत्तरादाखल भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी मोटारसायकल चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Manorama Khedkar Sent to Judicial Custody: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी)
पहा व्हिडिओ-
A gang involved in stealing dogs is reportedly active in Pune. A Boxer breed dog, valued at ₹50,000, was stolen from Gujarwadi Phata on Pune-Satara Road by thieves on a motorcycle.
The incident occurred when two thieves on a motorcycle snatched the dog belonging to a… pic.twitter.com/bgeZoz7QgP
— Pune Mirror (@ThePuneMirror) July 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

