Manorama Khedkar Sent to Judicial Custody: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. काही दुवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी (Pune Police) ते पिस्तूल जप्त केले. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. प्रत्येकी दोन दिवसांच्या या पोलीस कोठडी सुनावण्यात आल्या होत्या. आता पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मनोरमा खेडकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडी म्हणजेच येरवडा कारागृह होऊ शकते.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)