अनिश्चित काळासाठी बंद असेलल्या जेट एअरवेज (Jet Airways)या सरकारी कंपनीच्या वरिष्ठ टेक्निशियनने इमारतीच्या छतावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. ते कर्करागाच्या आजाराने ग्रस्त होते. शैलेश सिंह (Shailesh Singh) असे या टेक्निशियनचे नाव आहे. पाठीमागील तीन महिन्यांपासून शैलेश सिंह (वय 45 वर्षे) यांना मासिक वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे गेले बराच काळ ते नैराश्येत होते. तसेच, प्रदीर्घ काळापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर केमोथेरेपी करण्यात आली होती. त्यानंतर ते घरी परतले होते.
शैलेस सिंह यांनी पालघर येथील नालासोपारा पूर्व परिसरात 4 मजली इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. जेट एअरवेज एअरलाईन्स कर्मचारी तसेच व्यवस्थापन असोसिएशनच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शैलेश सिंह हे गेले प्रदीर्घ काळ आर्थिक टंचाईचा सामना करत होते. जेट एअरवेजच्या तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना गेले अनेक महीने वेतन मिळू शकले नाही. शैलेश सिंह हेसुद्धा त्याच कर्मचाऱ्यांपैकी एक होते. त्यांनाही गेले अनेक काळ वेनत न मिळाल्यामुळे आजारावरील उपचारासाठी पैसे उपलब्ध करता आले नव्हते.
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेज बंद झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शैलेश सिंह यांचे वडील आणि मुलगाही जेट एअरवेजमध्येच काम करत होते. त्यामुळे जेट एअरवेज बंद झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबच आर्थिक आरीष्ठात सापडले.
जेट एअरवेज कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे रोजगाराबाबत गप्पा करतात मात्र, 22,000 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला नैराश्येत ठकलण्यासाठीच त्यांनी जेट एअरवेज कंपनीला संपू दिले. हा एक गंभीर आणि गुन्हेगारी कटआहे. याचीसखोलचौकशीकरण्यातयावीअशीहीमागणी काँग्रेसनेकेलीआहे. (हेही वाचा, 'जेट एअरवेज'ने रद्द केली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कंपनीकडे केवळ 14 विमाने शिल्लक)
काँग्रेस प्रवक्ता आनंद शर्मा ट्विट
Shocked by the tragic suicide of a cancer-stricken executive of the Jet Airways. It is a tragic reminder that there was a criminal conspiracy involved. The PM talks about youth & jobs but allowed jet airways to collapse, pushing 22,000 staff members & their families into despair.
— Anand Sharma (@AnandSharmaINC) April 27, 2019
जेट एअरवेजवर तब्बल 8 हजारकोटी रुपयांचे कर्ज आहे. जेट एअरवेजला सुमारे १५ हजारकोटी रुपये देणेआरे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गेले २-३महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. जेट एअरवेज अधिकारी आणि स्टाफ इसोसिएशन यांच्यात अनेक वेळा बैठका झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही. वारवंवार मागणी करुनही केंद्र सरकारनेही काही केले नसल्याचा जेट एअरवेजचा आरोप आहे.