क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटाक |(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हृदयविकार (Heart Disease) या आजारास आता वयाचे कोणतेच बंधन राहिले नाही. खास करुन कोरोना महामारीनंतर हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या मृत्यूचे तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्येही वाढत असलेले प्रमाण हे अतिशय धक्कादायक मानले जात आहे. जालना (Jalna) शहरात 'फ्रेजर बॉईज' मैदानावर ख्रिसमस निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यानही अशीच घटना पाहायला मिळाली. येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका युवकाला ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack While Playing Cricket:) आला. ज्यामुळे त्याचा जागीच मत्यू झाला. विजय पटेल असे त्याचे नाव असून, तो केवळ 32 वर्षांचा आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ज्यामध्ये पाहायला मिळते की, फलंदाजी करत असलेल्या या तरुणाने उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर पुढच्या काहीच क्षणी तो जमीनवर कोसळला आहे.

मैदानावर काय घडलं नेमकं?

जालना शहरामध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्या आले होते. सामना सुरु होता. एक संघ गोलंदाजीसाठी मैदानात होता. प्रतिस्पर्धी संघाते दोन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानात होते. सामन्याचे समालोचन बाहेरील ध्वनिक्षेपकावरुन सुरु होते. सामना ऐन रंगात आला होता. स्ट्राईकवर असलेल्या फलंजादाने आपल्या खास शैलीत गोलंदाजाचा समाचार घेतला. त्याने गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूवर जोरदार फटकेबाजी करत उत्तूंग षटकार ठोकला. पण, धक्कादायक असे की, सर्वजण षटकार पाहात असताना हा फलंदाज मात्र पुढच्या काहीच क्षणी खाली कोसळला. सुरुवातीला षटकार ठोकल्यावर काही तांत्रिक कारणामुळे तो खाली बसतो आहे असे उपस्थितांना वाटले. पण पुढच्याच क्षणी तो कोसळल्याचे लक्षात येताच यष्टीरक्षक आणि त्याच्या बाजूला असलेला दुसराही फलंदाज त्याच्याकडे धावला. खाली नॉन स्ट्राईकवर असलेला फलंदाजही धावत वर आला. त्या खेळाडू तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही, डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, Accidental Death while playing Cricket: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागल्याने तरुणाचा मृत्यू)

मैदानावर तरुण खेळाडू जागेवरच कोसळतानाचे दृश्य

चुकीची जीवनशैली आकस्मिक मृत्यूस कारण?

अलिकडील काही काळामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा आकस्मिक कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे हे प्रमाण तरुणांमधील मृत्यूचे अधिक आहे. काही प्रमाणात अल्पवयीन मुलांचाही मृत्यू आकस्मिकपणे झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. परिणामी नागरिकांनी आपल्या मुलांच्या पालनपोषण आणि आहाराकडे अधिक सजगतेने लक्ष द्यायला हवे असे अभ्यासक सांगतात. शिवाय, बदलती जीवनशैलीसुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या आणि मृत्यूशी संबंधीत कारणांना कारणीभूत आहे असे मानले जात आहे. बैठ्या कामाचे वाढते प्रमाण, चुकीचा आहार, अपूरी झोप आदी कारणांमुळे हृदयविकार आणि तत्सम कारणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही अनेक अभ्यास आणि त्यांचे अहवाल दाखवत आहेत. त्यामुळे सृदृढ आरोग्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीच महत्त्वाची असल्याचे डॉक्टर सांगतात.