Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक निकालाचे (Lok Sabha Election Results) चित्र स्पष्ट होत असताना आणि इंडिया आघाडीची कामगिरी अपेक्षेपेक्षाही दमदार होत असल्याचे पुढे आल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी बारामती येथून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय तसेच, नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याशी झालेल्या कथीत संवादाच्या बातम्या यांवरही भाष्य केले. तसेच, आगामी काळात इंडिया आघाडी कसे काम करेल याबाबतही त्यानी भाष्य केले. काय म्हणाले, शरद पवार घ्या जाणून.

'विरोधकांची भूमिका योग्य असल्याची पावती'

शरद पवार यांनी म्हटले की, उत्तरप्रदेशमध्ये झालेले परिवर्तन हे लोकसभा निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत उत्तरप्रदेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विजय आणि पराभवाचे असलेले मार्जिन मोठ्या प्रमाणावर असायचे. मात्र, या निवडणुकीत हे मार्जिन प्रचंड प्रमाणावर कमी झाले. याचाच अर्थ आम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून किंवा विरोधकांची भूमिका म्हणून दिल्लीमध्ये आम्ही जी भूमिका घेतो, जे काम करतो ते योग्य दिशेने असल्याची पावती मिळते.  (हेही वाचा -  Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री)

'उद्याच्या बैठकीत निर्णय'

निवडणूक निकालामध्ये चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या दिशेने पावले टाकायची, कसे काम करायचे याबाबत आम्ही इंडिया आघाडीतल घटक पक्ष उद्या (5 जून) एक तातडीची बैठक बोलावू. या बैठकीला मी उपस्थित असेन. आम्ही सर्वजण मिळून बैठकीत निर्णय घेऊ आणि धोरण ठरवू, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, Nandurbar Lok Sabha Result 2024: नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; हिना गावितचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव)

'नितीश कुमार यांच्याशी बोलणे झाले नाही'

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत माझे केवळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांच्याशी बोलणे झाले आहे. देशातील इतर कोणत्याही नेत्यांसोबत माझे बोलणे झाले नाही. इंडिया आगाडीतील घटकपक्षांशी आवश्यक बोलणे झाल्यानंतरच इतरांशी बोलले जाईल, असे शरद पवार म्हणाले. तसेच, चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार किंवा इतर कोणाशीही बोललो नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, देशातील विविध नेत्यांशी आपले संबंध चांगले असल्याचे पवार यांनी म्हटले. (हेही वाचा, Jairam Ramesh on Narendra Modi: नरेंद्र मोदी यांचा नैतिक आणि राजकीय सुद्धा पराभव- जयराम रमेश)

'बारामतीच्या विजयाची खात्री होती'

बारामतीमध्ये आमच्या पक्षाला चांगले मताधिक्य मिळत आहे. तसेच, बारामतीची जनता योग्य निर्णय घेईल याची खात्री आम्हा सर्वांना पहिल्यापासूनच होती. त्यामुळे बारामतीमध्ये काही वेगळा निर्णय लागेल, असे आम्हाला कधीच अपेक्षीत नव्हते. बारामतीच्या जनेतने कामावर आणि केलेल्या कामाच्या मेरीटवर मतदान केले, असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीला जे यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे श्रेय सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाते. त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. शिवाय, आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (UBT) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राज्यातील नेत्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी चिकाटीने काम केले आणि आपल्या पक्षासह मित्रांनाही बळ दिले. मात्र, एक बाब निश्चित आहे, उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आम्हाला हिंदी पट्ट्यात अधिक काम करावे लागेल, असेही पवार यांनी म्हटले.