Onion Prices Rise In Maharashtra: परतीच्या पावसाचा कांद्याला बसला फटका, दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला बसणार कात्री
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

परतीच्या पावसामुळे (Rain) नवीन कांदा (Onion) पिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी (Maharashtra Farmers) साठवून ठेवलेल्या जुन्या कांद्याची मागणी इतर राज्यांमध्ये (State) झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही (Onion Rate) झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याला 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल.  त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढतील. महाराष्ट्रासह कर्नाटकात परतलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्येही परतीच्या मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे.

पावसात नुकसान झालेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची लागवड करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नाही. यामुळे साठवलेल्या कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये किलो मिळत आहे. हेही वाचा Nagpur Metro Recruitment: नागपूर मेट्रो मध्ये नोकरीची संधी; 8 नोव्हेंबर पूर्वी असा करा अर्ज

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 100 ते 130 वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे कांदा 30 ते 45 रुपये किलोने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा 50 ते 55 रुपये किलोने विकला जात आहे.  पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर, जुन्नर आणि नाशिक, संगमनेर, अहमदनगर येथील शेतकरी कांद्याचा मोठा साठा ठेवतात. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दररोज सुमारे 50 वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते.

नाशिकच्या लासलगाव बाजारात सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती मिळाली आहे. लासलगाव बाजार समितीने ही माहिती दिली आहे.  सध्या नवीन कांदा बाजारात उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला देशभरात सर्वाधिक मागणी आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे पुढील काही दिवस कांदा स्वस्त होण्याची आशा नगण्य आहे.