Nagpur Metro Recruitment:  नागपूर मेट्रो मध्ये नोकरीची संधी; 8 नोव्हेंबर पूर्वी असा करा अर्ज
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नागपूर मेट्रो (Nagpur Metro) मध्ये अतिरिक्त महाव्यवस्थापक ते कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांवर नोकरीच्या संधीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इच्छुक उमेदवार 8 नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्जा करू शकणार आहेत. यामध्ये 29 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहेत. तर 14 विविध पदांवर ही नोकरभरती होईल. अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागदपत्र जोडून आपला अर्ज मेट्रो कार्यालयात पाठवू शकतात. दरम्यान मुलाखती नंतर शारिरीक चाचणी घेऊन उमेदवार निवडले जाणार आहेत. नक्की वाचा: Indian Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास झालेल्यांसाठी 6891 पदांची भरती .

नागपूर मेट्रो मध्ये संयुक्त महाव्यवस्थापक ते मुख्य नियंत्रक, कनिष्ठ अभियंता या पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी पदानुसार पात्रता निकष वेगळे असणार आहेत. तर प्रतिमहिना पगार हा किमान 1,60,000/- रुपये प्रतिमहिना ते 2,60,000/- रुपये प्रतिमहिना इतका असणार आहे. BE/B.Tech केलेल्यांना या भरती प्रक्रियेमध्ये त्यांच्या अनुभवानुसार विविध पदांवर अर्ज करता येणार आहे. इथे पहा नोकर भरतीची सविस्तर जाहिरात.

नागपूर मेट्रो मध्ये अर्ज करताना एससी, एसटी, महिला उमेदवार यांना फी माफ असणार आहे तर विना आरक्षित आणि ओबीसी वर्गातील अर्जदारांना 400 रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहेत. डिमांद ड्राफ्ट किंवा ऑनलाईन पेमेंट द्वारा घेतल्या जाणार्‍या या शुल्काला परत दिले जाणार नाही.