Indian Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास झालेल्यांसाठी 6891 पदांची भरती
Indian Railway (Photo Credits: File Photo)

सरकारी नोकरीच्या (Government Jobs) प्रतिक्षेत असलेल्यांसाठी आनंदवार्ता आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेलने अप्रेंटिसच्या (Recruitment Cell Apprentice) विविध विभागासाठी एकूण 6,891 पदांसाठी भरती काढली आहे. 10 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून यात कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही. तर जाणून घेऊया काय आहे ही भरती प्रक्रीया, यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी...  (SSC Recruitment 2021: एसएससी कडून 3261जागांसाठी नोकरभरतीची घोषणा; 25 ऑक्टोबर पर्यंत ssc.nic.in वर असा करा अर्ज)

या नोकरीसाठी 10 वी पास असणं बंधनकारक आहे. मान्यता प्राप्त बोर्डाकडून, 10 वी पास झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय 15-24 वर्ष असणे गरजेचे आहे. दहावी आणि आयआयटी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (हे ही वाचा: SBI SO Recruitment 2021: एसबीआय मध्ये 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू; पहा कसा कराल अर्ज)

रेल्वे अप्रेंटिस भरती 2021 च्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी 432 तर ईस्टर्न रेल्वेत 3,366 आणि उत्तर रेल्वेत 3,093 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगच्या आधारे भरता येणार आहे. 432 पदांसाठी 10 ऑक्टोबर, 3,093 पदांसाठी 20 ऑक्टोबर तर 3,366 पदांसाठी 3 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. येथे पहा अधिकृत नोटीफिकेशन.

दरम्यान, यासंदर्भातील अधिक माहिती आणि अर्ज दाखल करण्यासाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटला भेट द्या. निवड झालेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टायपेंड देण्यात येईल.