
Maharashtra News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि इतर समाजसुधारकांच्या कार्याला समर्पित ‘मुक्तीपर्व’ (Muktiparv Festival) या दोन दिवसीय कार्यक्रमात आयोजित तीन महिला व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने केलेल्या तीव्र विरोधानंतर (Student Protests) रद्द करण्यात आला. प्राप्त माहितीनुसाह, आयोजित कार्यक्रमता हे तीन महिला अभ्यासक आणि जातविरोधी कार्यकर्त्यांची व्याख्याने होणार होती. मात्र, एबीव्हीपीने (ABVP) ने पुणे पोलिसांना पत्र देत यामध्ये 'विभाजनवादी, धार्मिक आणि जातीय वक्तव्ये' होऊ शकतात, असा आक्षेप घेतला. त्यानंतर या व्याख्यानांचे आयोजन रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात IISER पुणेच्या विद्यार्थी परिषदेने, विविध क्लब्सनी आणि आयोजन समितीने तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी हा निर्णय मनमानी आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
'टुकडे टुकडे गँग'ला विरोध असल्याचा दावा
ABVP ने या कार्यक्रमात 'टुकडे टुकडे गँग' शी संबंधित वक्त्यांना बोलावल्याचा आरोप केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताुसार ABVP च्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख अथर्व कुलकर्णी यांनी म्हटले, 'डॉ. आंबेडकर यांची जयंती सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये साजरी केली पाहिजे. मात्र, या कार्यक्रमासाठी ज्या व्यक्तींना बोलावलं जात आहे, ते देशविरोधी चळवळीशी संबंधित आहेत. अशा व्यक्तींच्या उपस्थितीमुळे संस्थेची आणि आंबेडकर विचारांची प्रतिमा मलीन होते. हे वक्ते आक्षेपार्ह असून त्यांच्यावर निर्बंध असावेत आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी. (हेही वाचा, Medchal Shocker: मुलींच्या वसतिगृहात वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने; 3 महिन्यांत 300 अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा)
‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमाचे प्रतिवर्ष आयोजन
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांमध्ये दीपाली साळवे (अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघटनेच्या महासचिव), नाझिमा परवीन (पश्चनिवेशवाद आणि धार्मिक अल्पसंख्याकांवरील अभ्यासक) आणि स्मिता पाटील (स्त्री व स्वच्छता कामगारांवरील अभ्यास करणाऱ्या प्राध्यापिका) यांचा समावेश होता. ‘मुक्तीपर्व’ हा कार्यक्रम IISER पुणे मधील दलित, आदिवासी व बहुजन विद्यार्थ्यांद्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या रद्दबाबत विद्यार्थी, अभ्यासक व इतरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी सेंसरशिप आणि वंचितांचे आवाज दाबण्याचा विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
समलैंगिक विद्यार्थ्यांच्या ‘प्राइड मार्च’ला देखील नाकारली परवानगी
IISER मधील ‘Aroha’, ‘Art Club’, ‘Disha’, ‘Kaleidoscope’, ‘Kalpa’, ‘Literary Club’ आणि ‘Satrangi’ या क्लब्सच्या समन्वयकांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ही घटना एकटीच नाही. फेब्रुवारीमध्ये ‘Satrangi’ या समलैंगिक विद्यार्थ्यांच्या समूहाने आयोजित केलेल्या ‘प्राइड मार्च’ला देखील अशाच पद्धतीने परवानगी नाकारण्यात आली होती. या क्लब्सनी आरोप केला आहे की, आयोजकांना तक्रारींच्या संपूर्ण तपशीलाची माहिती दिली गेली नाही, त्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. त्यांनी म्हटले, 'संस्थेची प्रक्रियाव्यवस्था पाळली जात नसल्याचे हे उदाहरण असून, भविष्यातील सर्व विद्यार्थी-क्लब कार्यक्रमांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल.'
क्लब्सनी मागणी केली आहे की, ‘मुक्तीपर्व’ आणि ‘Satrangi’ कार्यक्रमांविषयी झालेल्या तक्रारी सार्वजनिक करण्यात याव्यात आणि संस्थेने आयोजनासंदर्भात पारदर्शकता ठेवावी. 'जर बाह्य धमक्या दिल्या जात असतील, तर विद्यार्थ्यांना सुरक्षा देणे ही संस्थेची जबाबदारी आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मुक्तीपर्व’ च्या माजी आणि विद्यमान आयोजकांनी सांगितले की, 'आम्ही विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या सेन्सॉरशिप आणि वंचितांचे आवाज दाबण्याचा प्रतिकार करू. देशभरातील दलित-आदिवासी-बहुजन विद्यार्थी आणि प्रगतीशील संघटनांनी या प्रकाराच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन आम्ही करतो.'
आयोजन समितीने या रद्दबाबत सांगितले की, 'हा निर्णय शैक्षणिक संस्थांमध्ये वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आणखी एका हल्ल्याचे उदाहरण आहे.' IISER पुणेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "कार्यक्रमात कुठलाही आक्षेपार्ह विषय मांडला जाऊ नये यासाठी नियोजन केले होते, पण वाद टाळण्यासाठी कार्यक्रम रद्द केला गेला." संस्थेने पुढे स्पष्ट केले की, "डॉ. आंबेडकर जयंती आणि वर्षभर आम्ही त्यांचे विचार पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत."
दीपाली साळवे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरून या निर्णयावर टीका करत ABVP वर सवाल उपस्थित केला. त्यांनी लिहिले, 'फक्त ABVPच्या गुंडांना चर्चासत्राची अडचण होती, त्यामुळे त्यांनी DCP पुणे यांच्याकडे अर्ज करून हे व्याख्यान आणि ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम थांबवला. अनेक विद्यापीठांमध्ये हिंदू सण साजरे होतात, जिथे वक्ते असंविधानिक वक्तव्य करतात. तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेतला जात नाही का?'