Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ (Muhammad The Messenger Of God) या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी रजा अकादमी या संस्थेने राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र केंद्र शासनास पाठविले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाचे प्रसारण 21 जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र, त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते. त्यामुळे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी. (हेही वाचा - मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्याची मुदतवाढ)

याशिवाय युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी या पत्रात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती सदर मंत्रालयाला केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.