Mumbai Shocker: महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या वडाळ्यातील 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Dead Body | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Shocker: वडाळ्यातील (Wadala) शांतीनगर झोपडपट्टीतून जानेवारी महिन्यात बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह (Headless Body)

सापडला आहे. या घटनेमुळे पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. मृत मुलगा बेपत्ता झाल्यानंतर लगेचच, मुलाच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितास पकडले आणि वडाळा ट्रक टर्मिनल्स (टीटी) पोलिसांच्या स्वाधीन केले. वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी संदिप उर्फ राज यादव या मृत मुलाचा मृतदेह मच्छीमाराला आढळून आल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

संदिप हा मच्छीमाराचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी खारफुटीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक मच्छिमाराला जाहिरात बॅनरच्या फेकलेल्या रोलमधून एक हात बाहेर पडलेला दिसला. त्याने ताबडतोब पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी बॅनर रोल उघडला. यात त्यांना मुलाचा अत्यंत कुजलेला डोके नसलेला मृतदेह आढळला. त्यांना यात एक कवटी सापडली असून ती मुलाची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा -Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक)

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. आम्ही अज्ञात आरोपीविरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, असं डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी मुलाचे वडील बेचाई यादव यांनी वडाळा पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. (वाचा - ( हेही वाचा- भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल

यादव यांनी पोलिसांना सांगितले की, 28 जानेवारी रोजी संदिप रात्री 8 वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला होता, परंतु तो परतलाच नाही. यादव आणि शेजारच्या काही मुलांनी संदिपचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर संदिप पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या बिपुल सिगरीसोबत फिरताना आढळला. दुसऱ्या दिवशी, स्थानिकांनी बिपुलला पकडले, त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला.

दरम्यान, तपास करत असलेल्या शहर गुन्हे शाखेने संशयिताचा पुणे, दिल्ली आणि नंतर जम्मू-काश्मीरमध्ये माग काढला. परंतु, तो सापडला नाही. प्राथमिक चौकशीत बिपुलने किरकोळ चोरी केल्याचं समोर आलं आहे.