Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक

पुण्यातील वाघोली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि चालकाला कोयत्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे

Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक
School Van PC TWitter

Pune Koyta Gang:  पुण्यातील वाघोली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि चालकाला कोयत्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १७ वर्षाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेक कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये सहा ते दहा वयोगटातील किमान आठ विद्यार्थी बसले होते. त्यांच्या शाळेत जात असताना ही घटना घडली. घटनेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोयत्याने व्हॅनच्या काचा फोटल्याने चालकाला दुखापत झाली आहे. सचिन इंगवले असं चालकाचे नाव आहे. त्यांच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2024 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).