Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकुळ, भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल
पुण्यात दिवसेंदिवस कोयता गॅंगचा हल्ला वाढत चालला आहे. भर दिवसा तरुणावर कोयताने वार केल्यामुळे परिसर हादरले.
Pune Koyta Gang: पुण्यात (Pune) गेल्या अनेक महिन्यापासून कोयता गॅंगचा धुमाकुळ माजला आहे. दरम्यान पुण्यातील धायरी परिसरात पुन्हा कोयता घेवून तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. धायरी फाट्यावर सकाळी एका टोळक्यांनी चहाटपरी समोर एका तरुणाली बेदम मारले. कोयत्याने सपासप वार केला. या घटनेतील आरोपींनी पोलीस शोधत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीला पकडणार आहे. भर रस्त्यात तरुणावर वार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलीसांत या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भररस्त्यावर सकाळी पावणे दहाच्या वेळी काही तरुण टोळ या तरुणाला मारण्यासाठी धायरी फाट्याजवळ आले. जवळील चहाच्या टपरीवरिल चहाच्या किटलीचा आघात देखील केला. त्यानंतर कोयत्याने वार केला. भर दिवसा तरुणांवर होणाऱ्या हल्लामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या सुरक्षेतचा प्रश्न उभारला आहे. स्थानिकांच्या मदतीने पीडित तरुणाला नवले रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच आली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला पकडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पीडीत तरुण आणि टोळक्यात काल रात्री वाद झाला आहे. आणि या वादात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. असा प्राथमिक अंदाज पोलीसां कडून देण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस आणखी तपासणी करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2023 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

