इमारत (संग्रहित संपादित प्रतिमा)

Bhiwandi News: भिवंडी (Bhiwandi) परिसरातील रोशन बाग येथील सात मजलीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडलं. या दुर्घटनेत त्याचा जीव वाचला आहे. असं भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada Police) सांगितली आहे. इमारतीतील सहाव्या मजल्यावरील काम अर्धवट राहिल्याने त्याचं खेळत असताना तोल खाली गेला. आणि एका रिक्षाच्यावर पडला. दरम्यान त्याला गंभीर जखमा झाल्याने स्थानिकांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात पोहचवले. सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भोईवाडा पोलिसांनी या संदर्भात नोंद घेतली.

भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरातील गोल्डन हॉटेलजवळ जीलानी कॉम्प्लेक्स  सात मजल्या इमारती आहे. तेथून सहव्या मजल्यावरुन १२ वर्षीय मुलाचा पाय घसरत खाली पडल्याची घडला घडली आहे. इर्शाद अहमद खान संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत खेळत असताना ही घटना घडली. नेहमी प्रमाणे लहान मुलं सहाव्या मजल्यावर पकडापकडी खेळत असतं. सहाव्या मजल्यावर गॅलरीचे काम अपुरे असल्याने गॅलरीत खेळणे धोकादायक होते. मुलं खेळत असताना अचानक इर्शादचा तोल खाली गेला. आणि तो रिक्षावर पडला. पडल्यावर आवाज देखील खूप मोठा आला. त्याने स्थानिकांनी गोधंळ घालायला सुरु केला. परिसरात कळताच लोकांनी गर्दी करायला सुरु केली.

रिक्षावर पडल्याने डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मुलांचा आवाज ऐकताच स्थानिकांनी धाव घेतला. दरम्यान परिसरात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची अफवा परसवली. स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केलं. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.संपूर्ण घटनेची भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.खासगी रुग्णालयात त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहे. हळूहळू ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितले आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून देखील इर्शाद सुदैवाने बचावला आहे.