
Pune Major Fire: पुण्यातील सांळूके विहार परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी 15 जुलै रोजी ही घटना घडली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (MNGL)च्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील परिसरात भयंकर आग लागली आहे. आग लागल्यामुळे स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि 2 पाण्याचे टॅंकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे.
अग्निशामक दलाला या घटनेची माहिती 12 च्या सुमारास मिळाली, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जीवितहानी संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आग इतक्या वेगाने वाढली की, आजूबाजूच्या परिसरातील गाड्याचे नुकसान देखील झाले.परिणामता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भाची नोंद घेण्यात आली आहे. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतला.
आग इतकी भयंकर होती आग अद्यापही नियंत्रणात येऊ शकली नाही. साळंकू विहार परिसरात आग लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी नियंत्रणात यावी याकरिता नागरिकांनी सहकार्य दाखवले. परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर खबरदारी म्हणून सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.