बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) तालुक्यात येणाऱ्या अनेक गावांतील नागरीक टक्कल पडणे (Baldness ), केस गळणे (Hair Loss) यांसारख्या अचानक उद्भवलेल्या समस्यांनी ग्रस्त आहेत. गावातील लहान मुले, तरुण, महिला आणि जेष्ठांनाही ही समस्या उद्भवत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन आणि आयसीएमआर द्वारे गावात पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान गोळा करण्यात आलेले नमुने, प्राप्त झालेले अहवाल यांमधून या समस्येची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दरम्यान, या गावांपैकीच एक असलेल्या माटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयास आरोग्य विभागाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. या लेखी पत्रात गावातील ग्रामस्थांना इशारा (Hair Care Tips) देण्यात येत आहे की, गावातील पाणी पिण्योग्य नाही. तसेच, ते वापरण्यासही अपायकारक आहे. विविध चाचण्या आणि पडताळणीत हा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी काळजी घेणे अपेक्षीत आहे. आगोदरच हवालदील झालेले गावकरी या पत्रानंतर अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
आरोग्य विभागाचे पत्र, एक सूचक इशारा
बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाकडून माटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयास प्राप्त झालेले पत्र म्हणजे एक सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे. पत्रात म्हटले आहे की, गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास योग्य नाहीच. पण, या पाण्यामध्ये नायट्रेट आणि क्षार यांचे प्रमाण अधिक आहे. सामान्यत: पाण्यामध्ये प्रति किलो 45 ग्रॅम इतके नायट्रेट असते. पण या गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत नायट्रेटचे प्रमाण 51.7 ls 61.4 ग्राम इतके आढळले आहे. ज्यामुळे गावकऱ्यांना केस गळणे आणि टक्कल पडणे या समस्येला सामोरे जावे लागत आहे. (हेही वाचा, Premature Hair Loss Prevention: अकाली केस गळणे आणि टक्कल पडणे टाळण्यासाठी काय करावे?)
गावातील 12 हजार नागरिक हैराण
अधिक नायट्रेटयुक्त पाणी अधिक प्रमाणावर सेवन करणे आणि वापरणे आदींमुळे गावकऱ्यांमध्ये केस गळती पाहायाला मिळत आहे. गावात सर्वच म्हणजे जवळपास 12000 नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागला असून, 29 जणांना टक्कल पडणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला आहे. आरोग्य विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, गावाला पाणिपुरवठा करणारी विहीर आणि दोन बोअरवेल यांमध्ये नायट्रेटयुक्त पाणी आहे. ज्याचा अपाय गावकऱ्यांवर होतो आहे. (हेही वाचा, Hair Loss Outbreak Buldhana: केस गळणे, टक्कल पडणे प्रकरणी ICMR द्वारे चौकशी; दिल्ली, चेन्नईचे पथक बुलढाणा जिल्ह्यात)
गावातील नायट्रेटयुक्त पाणी आणि त्यापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. गावातील समस्या आणि उपाययोजनांबाबत दुजोरा आणि माहिती देताना ग्रामविकास अधिकारी आर आर सावरकर यांनी म्हटले की, हे गाव जवळपास 12000 हजार उंबऱ्याचे आहे. त्यामुळे गावातील समस्याग्रस्त नागरिकांची संख्याही मोठी आहे. समस्येचे प्राथमिक कारण पुढे आले असून, गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोनाज केल्या जात आहेत. दरम्यान, गावऱ्यांना दवंडी आणि इतर माध्यमांतून सदर समस्या आणि उपाययोजना याबाबत माहिती दिली जात आहे.