Photo Credit- X

Palghar Train Derailment: मंगळवारी संध्याकाळी पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले. या घटनेमुळे गुजरातमधून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. डहाणू रोड-पनवेल-वसई रोड, वसई रोड-पनवेल-वसई रोड आणि वसई रोड-पनवेल-डहाणू रोड या तीन रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 43 डब्बे असलेली आणि लोखंडी कॉइल असलेली ही मालगाडी विशाखापट्टणमहून गुजरातमधील करंबेलीकडे जात होती. (हेही वाचा:Mumbai Local Train: महिलांचा लोकल प्रवास होणार आणखी सुखकर; जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात लागणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही)

36 तासांचा ब्लॉक

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तार करण्याचं काम सुरु आहे. प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 आणि २ जून रोजी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल अशी शक्यता आहे. परिणामी सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.