Virar Murder Case: विरारमध्ये 60 वर्षीय महिलेची जावयाकडून हत्या; आरोपीला अटक
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Virar Murder Case: विरार (Virar) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरात बुधवारी एका 60 वर्षीय महिलेची तिच्या 41 वर्षीय जावयाने (Son-in-Law) हत्या (Murder) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. प्रशांत खैरे असं या आरोपीचं नाव आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित लक्ष्मी खांबे यांच्यावर प्रशांत खैर याने चाकूने वार केले. प्रशांतच्या मते लक्ष्मी यांनी त्याच्या पत्नीला त्याला सोडण्यास सांगितले होते. सासूचा खून करताना आरोपीची दोन्ही मुलं घटनास्थळी हजर होती. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि ते मदतीसाठी ओरडू लागले.

प्राप्त माहितीनुसार, प्रशांत खैरे यांनी 2012 मध्ये कल्पना खैरे (वय 39) यांच्याशी विवाह केला. हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह कल्पनाची आई लक्ष्मी खांबे यांच्यासोबत विरार पूर्व येथील जानुवाडी, साईनाथ नगर येथे राहत होते. खैरे यांच्या दारूच्या व्यसनामुळे आणि अपमानास्पद वागणुकीमुळे कल्पना तीन महिन्यांपूर्वी तिची मुले आणि आईसह त्याच परिसरात भाड्याच्या ठिकाणी राहायला गेली होती. (हेही वाचा -Vasai Murder Case: ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रेयसीची निर्घृण हत्या, वसईतील थरकाप उडवणारी घटना)

घटनेच्या दिवशी प्रशांतने कल्पना आणि तिची आई राहत असलेल्या नवीन निवासस्थानी जाऊन कल्पना यांच्याशी वाद घातला. कामावर जाण्यापूर्वी कल्पनाने त्याला निघण्याची सूचना केली. दुपारी एकच्या सुमारास प्रशांतचे कल्पनाची आई लक्ष्मी हिच्याशी भांडण झाले. प्रशांतने रागाच्या भरात किचनमध्ये जाऊन चाकू आणला आणि लक्ष्मी यांच्यावर वार केले. त्यावेळी घरात उपस्थित असलेली मुले मदतीसाठी धावत सुटली. (हेही वाचा -Indore Murder: धक्कादायक! महिलेच्या शरिराचे दोन तुकडे केलेला मृतदेह रेल्वेत आढळला, इंदूर मधील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू)

या सर्व प्रकारानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या हातांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे कल्पनाच्या शेजाऱ्यांनी लक्षात आले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात विरार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी लक्ष्मी खांबे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घरातून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून आरोपी प्रशांत याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार समजल्यानंतर कल्पनाला मोठा धक्का बसला. तथापी, गुन्ह्याचा साक्षीदार असलेल्या मुलांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. याशिवाय शेजाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत.