Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Local Train : महिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करताना काही वेळा अनेक समस्यांना सामोर जाव लागतं. मात्र, आता अशा त्रासातून त्यांची लवकरच सुटका होणार आहे. कारण जूनपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या डब्ब्यात टॉकबॅक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ होणार आहे. (हेही वाचा :Woman Gives Birth On Mumbai Local Train: कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch) )

काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांच्या महासंचालक कार्यालयाने रेल्वेतून प्रवास करणार्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये महिलांना प्रवासात जाणवणाऱ्या समस्या विचाराण्यात आल्या. यातील अनेक महिलांनी असं म्हटलं की, रात्री आणि पहाटे ६ पर्यंत प्रत्येक लेडीज डब्ब्यात एक सुरक्षारक्षक अथवा पोलीस तैनात असतात. मात्र या सुवेधेत आणखी भर टाकणे गरजेचे आहे. ५९ टक्के महिलांनी पोलिसांना प्रत्येक महिला डब्ब्यात सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक टॉकबॅक बसवण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक बसवण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेतील लोकल ट्रेनमध्ये असलेल्या ७७१ डब्ब्यांपैकी ६०६ डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही कमेरे आधीच बसवण्यात आलेले आहेत.

यातील उर्वरीत डब्ब्यांमध्ये मेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या डब्ब्यामध्ये शिरुन त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या दोन घटना काही महिन्यांपूर्वीच घडल्या होत्या. यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात शिरून त्यांच्यावर अत्याचार आणि हल्ला करण्याच्या धक्कादायक घटनांनी मुंबई हादरली आहे. तेव्हापासून लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचे प्लानींग सुरू आहे.