
Pune Crime: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल एका तरुणीने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना, एका तरुणीने मित्राची मदत घेऊन जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जाते आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस दिवसेंदिवस गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपक्रम करत आहे. हेही वाचा- रात्री उशिरा पर्यंत पब चालू असल्यामुळे पुणे पोलिसांकडून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली आहे. महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मंगल गोखले असं मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मंगल यांची मुलगी योगिता गोखले आणि तिचा मित्र यश शितोळे यांना ताब्यात घेतले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, योगिताने मित्र यशच्या मदतीने आईच्या बॅंक खात्यातून पैसे काढले होते. पैसै तर काढले पण आईला ही गोष्ट कळेल तर रागवले. त्यामुळे या भीतीने योगिताने आईची हत्या केली आहे. मित्राच्या मदतीने तिने प्लान आखला होता. काही निमित्तासाठी यशला घरी बोलावलं.
तिने प्लान आखला आणि आपल्या मित्राला घरी बोलावलं. घरातील हातोडा त्याला दिला. त्यानंतर या मित्राने आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात हातोडा घातला. जोरात मार लागल्याने यातच आईचा मृत्यू झाला. झोपेत असताना आईच्या डोक्यावर हातोडा घातला. या घटनेत त्या जागीच निपचित पडल्या आणि जागीच मृत्यू झाला.
कुणाला संशय येऊ नये म्हणून आई पाय घसरून पडली अशी खोटी माहिती समोर आणली. दरम्यान नातेवाईकांना वेगळाच संशय आल्याने पोलिसांना कडे धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच घरात उपस्थित असलेल्या मुलीची चौकशी केली. पोलिसांनी चक्र फिरवत मुलीची खरी खोटी समोर आली. आता चंदन नगर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. योगिता सोबत यशवर गुन्हा दाखल केला आहे.