Pune News: पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या दोन प्रसिध्द पबवर पोलिसांनी छाप टाकली. पबमधून पोलिसांनी मुद्दमाल जप्त करून कारवाई सुरु केली आहे. शहरातील 'एलरो आणि युनिकॉर्न हाऊस' या दोन नामांकित पब्सवर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. (हेही वाचा- पुण्यात पब-बार व्यवसायीकांना पोलीस आयुक्तांचा इशारा)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पबमध्ये पोलिसांनी २८ लाख रुपयांचाच मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही पब रात्री १.३०नंतर सुध्दा डी जे वाजवत होते. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत असल्यामुळे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. येरवडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सगळ्या हॉटेल आणि पब आणि बार यांना सुरु ठेवण्यासाठी रात्री १.३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, या आदेशाला फेटाळून दोन प्रसिध्द पब रात्रीचे १.३० नंतर देखील सुध्दा चालू होते.
पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष देत दोन्ही पबवर छापा टाकला. डीजे साऊंड सिस्टिमने नागरिक हैराण झाले होते त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली. त्यानंतर पोलिस पबमध्ये पोहचले. दोन्ही पबमधून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एलरो आणि युनिकॉर्न हाऊस पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि कारवाई करण्यात आले आहे.