Ratnakar Gutte | (Photo Credits: Facebook)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने रासप (RSP) आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांना आणखी एक धक्का दिला आहे. रत्नाकर गुटे यांची बीड (Beed) जिल्ह्यात असलेली पोल्ट्री (Poultry) ईडीने जप्त केली आहे. शेतकऱ्यांची 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, ईडीने या आधीही आमदार गुट्टे यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा पोल्ट्री जप्त (ED Seized Poultry) केल्याने गुट्टे यांची या प्रकरणाने अद्यापही पाठ सोडली नाही असेच दिसते.

गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिलची जवळपास 100 एकरांची जमीन ईडीने पाठीमागील आठवड्यात जप्त करण्यात आली आहे. ही जमीनही शेतऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणीच जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने जप्त केलेली आमदार गुट्टे यांची पोल्ट्री बीड जिल्ह्यात असलेल्या परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील वरवई गावात आहे. ईडीने एका प्रकरणात आमदार गुट्टे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मत्र, गुट्टे यांनी प्रकृती बिघडल्याचे सांगत चौकशीला उपस्थित राहणे टाळले. (हेही वाचा, ED Major Action RSP MLA Ratnakar Gutte: रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेडसह 225 कोटी रुपयांची संपत्ती जप्त)

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असलेले रत्नाकर गुट्टे हे पाठीमागील प्रदीर्घ काळापासून ईडीच्या रडारवर आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ईडीने आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता या पूर्वीच जप्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईडीने PMLA कायद्यान्वये आमदार गुट्टे यांची संपत्ती जप्त केली आहे. कोणतीही संपत्ती ईडीने जप्त केली असेल तर त्याची माहिती इडी कोर्टाला देते. कोर्टाे त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच ती संपत्ती ईडी आपल्या ताब्यात घेतेल. कायदेशीर कारवाई केल्यानंतर गुट्टे यांच्या अनेक मालमत्ता ईडीच्या ताब्यात आल्या आहेत. दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. तेव्हापासून ते कुठे फारसे दिसले नाहीत. मात्र, एकदा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते.