महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या नाना पटोले यांचा संघर्षमय जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या
Nana Patole (Photo Credits: Twitter/ANI)

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी (President of Maharashtra Legislative Assembly) काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. तसेच भाजपकडून किसन कथोरे यांनी अर्ज केला होता. शनिवारी महाविकास आघाडीने सरकार स्थापनेसाठी बहुमत सिद्ध केले. त्यानंतर आज नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. (हेही वाचा - Maharashtra Government Formation: उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती 22 डिसेंबरला होणार; प्रफुल्ल पटेल यांची माहिती)

कोण आहेत नाना पटोले ?

नाना पटोले हे भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबातील असून ते साकोली मतदार संघातून निवडून आलेत. यापूर्वी नाना पटोळे हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 ते 2017 मध्ये नाना पटोले भाजपचे खासदार होते. मात्र, 2017 मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपला रामराम ठोकला होता.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य; राज्यपालांकडे करणार याचिका दाखल

त्यानंतर नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पटोले यांनी विधानसभेसाठी साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांना यश मिळालं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता, अशी नाना पटोले यांची ओळख आहे. नाना पटोले हे विदर्भातील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.