(Photo Credit: ANI )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या (Mahavikasaaghadi)  सरकारने आज विधानसभेत बहुमताची अग्निपरीक्षा पार केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker), उपाध्यक्ष (Aseembly Deputy Speaker) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)  पदावर कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र याबाबत अधिकृत निर्णय समोर येण्यासाठी 22 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी राज्यात नागपूर (Nagpur) येथे दरवर्षीप्रमाणे हिवाळी अधिवेशन (Winter Session) पार पडेल आणि मग हा उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल असेही पटेल म्हणाले.

विधानसभेचं उपाध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती होणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी अजित पवार यांचे व राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य; राज्यपालांकडे करणार याचिका दाखल

ANI ट्विट 

महाविकास आघाडीचं सत्तावाटप निश्चित होताच शिवतीर्थावर 28 नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडला यावेळी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाची धुरा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली,याच वेळी तिन्ही पक्षातील मिळून 8 नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय, ठरलेल्या सत्तावाटपानुसार, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे असणार आहे, या पदासाठी आता काँग्रेस कडून नाना पटोले तर भाजप कडून किसन कथोरे यांच्या मध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आजचा दिवस ठाकरे सरकारची वैध सत्ता स्थापना करण्याच्या अनुषंगाने महत्वाचा ठरला. 160 विरुद्ध 0 अशा पाठिंब्याने उद्धव ठाकरे यांनी वैधरित्या मुख्यमंत्रीपदाची दावेदारी सिद्ध केली.