पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्याघ्र संवर्धनाला प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो. ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून (Melghat Tiger Reserve) जाणारा 'अकोला-खांडवा' प्रस्तावित रेल्वे गेज (Broad Gauge) परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. या रेल्वे मार्गाला लागून 23.48 किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लागणार नाही. तसेच जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. (हेही वाचा - Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; अशोक चव्हाण यांची माहिती)
While development is important, the CM has stressed on the long term detrimental impacts on the habitat of the Tigers & the Wildlife which needs to be considered and a viable alternative for the proposed gauge conversion of railway line should be worked out.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2020
या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 1973-74 मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. हा प्रकल्प 2768.52 चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे या भागातील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल.
वन्य जीवांच्या संरक्षणासाठी याआधी 16 गावे आणि या प्रकल्पाबाहेरील 6 गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 किमी परीघातालीचं होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले. भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली आहे.