Photo Credit- X

Delhi HC on Puja Khedkar: दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला(Puja Khedkar) अटकेपासून मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. आज त्या प्रकरणाबाबतची सुनावणी पार पडली. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करणे योग्य नाही असे म्हणत दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरची बाजू त्यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीकडून बाजू मांडली. २१ ऑगस्टला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पूजा खेडकरला अटके पासून सुरक्षित करण्यात आले. (हेही वाचा:IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असतानाच वरिष्ठांसोबत गैरवर्तन केल्याने पूजा खेडकर चर्चेत आली होती. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. तर दिल्ली पोलिस आणि यूपीएससीला तिच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर नोटीस बजावली आहे. खंडपीठाने पोलीस आणि यूपीएससीला कथित कट रचल्याप्रकरणी आणि खेडकरची कोठडी का आवश्यक आहे? याचे स्पष्टीकरण आपल्या उत्तरात देण्यास सांगितले आहे. (हेही वाचा:Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची UPSC च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव; IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा )

UPSC चे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी युक्तीवााद करतना म्हटले की, 'हे असे प्रकरण आहे, ज्यामध्ये मानसिक विद्याशाखांचा गैरवापर केला गेला आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हा एक सुनियोजित गुन्हा आहे.' दिल्ली न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला जामीन नाकारला होता आणि इतर कोणत्याही व्यक्तींनी OBC आणि PWD अंतर्गत कोट्याचा लाभ घेतला आहे का? याचा तपास करण्याचे निर्देशही दिल्ली पोलिसांना दिले होते. खेडकरवर UPSC परीक्षा पास करण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंग व्यक्तींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.UPSC ने कारवाई करत या महिन्याच्या सुरुवातीला खेडकरची निवड रद्द केली होती आणि तिला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून भविष्यातील लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा देण्यावर निर्बंध घातले होते.

यूपीएससीने केलेल्या तपासणीनुसार, खेडकरने "तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचा फोटो,स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी बदलून तिची खोटी ओळख निर्माण केली होती.