Pune Porsche Car Accident: काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत त्याच्या पोर्श कारने दोन जणांना उडवले(Porsche Car Accident). यात दोघांची हत्या झाली. 25 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालगृहातून सोडण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने बाल न्याय मंडळाचा निर्णय रद्द करताना अल्पवयीन आरोपीला तुरुंगात ठेवणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुणे पोलीस (Pune Police) सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.(हेही वाचा: Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर; Bombay High Court चा मोठा निर्णय)
पोस्ट पहा-
Maharashtra | Pune Police to move Supreme Court against High Court's order which allowed the release of juvenile accused in Pune car accident case: Senior Police Official, Pune City Police
— ANI (@ANI) July 1, 2024
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुणे पोलिसांनी 26 जून रोजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून आता राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्याचे पुणे पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुणे पोलीस लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देतील. सध्या अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा, हॉटेल व्यवस्थापक, डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे.