Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर; Bombay High Court चा मोठा निर्णय
पुणे शहरात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने त्याच्या वेगवान पोर्श कारने दोन तरुणांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता.
Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचा आदेश आहे की, अल्पवयीन आरोपीला त्याच्या आत्याकडे राहावे लागेल. या प्रसिद्ध खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आरोपीच्या सुटकेचा आदेश दिला. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली होती. तसेच जो अपघात झाला तो संवेदनशील असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र याचा परिणाम अल्पवयीन आरोपीवरही झाला आहे.
मानसशास्त्रज्ञांसोबत अल्पवयीन मुलांचे सत्र सुरू ठेवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, पुणे शहरात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने त्याच्या वेगवान पोर्श कारने दोन तरुणांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा: Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात मुंबई सायबर पोलीसांकडून प्रमुख संशयितांना अटक; तब्बल 1.17 कोटी रुपयांची फसवणूक)
पहा पोस्ट-
Bombay High Court grants bail to the juvenile accused in the Pune car accident case. pic.twitter.com/W6MRyW1OBJ
— ANI (@ANI) June 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

