Pooja Khedkar Case: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Trainee Pooja Khedkar)प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यूपीएससीने (UPSC)पद काढून घेतल्याच्या विरोधात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. यूपीएससीने (UPSC) आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे. त्यामुळे आता यूपीएससी विरोधात पूजा खेडकर तायदेशीर लढाई लढणार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने आधी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. (हेही वाचा: IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई)
पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. अशामध्ये अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पळून गेली असल्याची चर्चा सुरू आहे. पूजा खेडकरचा मोबाईल देखील नॉटरिचेबल लागत आहे. अशामध्ये पूजा खडेकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. रविवारी रात्री पूजा खेडकरने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासाठी आज सकाळी कोर्टात प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने याचिकेमध्ये DOPT ला पक्षकार बनवले आहे.
दरम्यान, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर 3 जुलै रोजी येरवडा कारागृहातून मनोरमा खेडकरची सुटका झाली. मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावले होते. याप्रकरणी त्यांना पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली होती. अटकेनंतर मनोरमा खेडकरची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मिळाला असून त्या जेलमधून बाहेर आल्या आहेत.