Dasara Melava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विजयादशमी (Vijayadashami) अर्थातच दसरा सण (Dussehra 2024) आणि विधानसभा निवडणूक 2024 (Vidhan Sabha Election 2024) ची पार्श्वभूमी असा मेळ घालत राज्यात आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आज वेगवेगळे नेते आणि पक्षांचा स्वतंत्र दसरा मेळावा (Dasara Melava 2024) पार पडत आहेत. यात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणारा आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आझाद मैदानावर पार पडत असलेला मेळावा विशेष चर्चेत आहे. शिवाय बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचाही दसरा मेळावा पार पडत आहे.

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा

शिसेना (UBT) पक्षाचा दसरा मेळावा आज सायंकाळी 5 वाजता शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता सुरु होईल. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात, आपल्या पक्षाची कोणती दिशा ठवरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या संयत पण मिष्कील भाषेत टोले लगावणे हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे खास वैशिष्ट्य आहे. आज ते कोणावर तोफ डागतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने घोषित केलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याला Sena UBT पाठिंबा देईल; Uddhav Thackeray यांची घोषणा)

एकनाथ शिंदे यांचा

पाठिमागील एक वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दसरा मेळावा घेतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून बाजूला झाल्यापासून त्यांनीही आपल्या समर्थख आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेण्यास सुरवात केली असून, यंदा हा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या मेळाव्यास जवळपास दीड लाख लोक उपस्थित राहतील असा दावा केला जात आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde Davos Trip Dues: मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात 1.58 कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस)

बीडमध्ये मेळाव्यांचा डबलबार

प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यावर झालेल्या समेटानंतर बीड येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊबहीण प्रथमच एका व्यासपिठावर दिसणार आहे. या बहिणभावाचा मेळावा गोपीनाथ गडावर पार पडणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यास लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मनोज जरांगे यांचाही मेळावा

पाठिमागील प्रदीर्घ काळापासून मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावर आंदोलन करणारे आणि तो विषय लाऊन धरणारे मनोज जरांगे पाटील, हे देखील बीड येथेच आपला दसरा मेळावा घेत आहेत. बीड जिल्ह्यातील नारायण गडावर हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र आज मोठ्या उत्साहात दसरा सण साजरा करत आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनता हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. पाठिमागील काही वर्षांपासून राजकीय मंडळीसुद्धा या सणानिमित्त विशेष सभा, मेळावे घेऊन आपला सण वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. त्यातच आता विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते अशी स्थिती असल्याने राज्यात पार पडणाऱ्या या सणाकडेही राजकीय मंडळींचे लक्ष आहे.