Chief Minister Uddhav Thackeray | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या सावटातून राज्याला सावरताना, राज्यशकट हाकताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  हे अत्यंत काळजीपूर्वक परीस्थिती हाताळत आहेत. ते पाहून राज्यातील जनतेलाही राज्याला मजबूत सरकार मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया (Social Media) त्यांच्याबद्धल कौतुकाने लिहितो, बोलतो आहे.  खरे तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना अनुभव नाही. ते कधी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर पडले नाहीत. त्यामुळे ते मुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही. जर स्वीकारलेच तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील तगडे नेते त्यांना गुंडाळून ठेवतील, अशी एक नकारात्मक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पसरली होती. मात्र, भाजपने केलेला विश्वासघात आणि राज्यात उत्पन्न झालेली त्रिशंकू स्थिती अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress  Party), काँग्रेस (Congress)  अशा तिन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे नेतृत्व स्वीकारले. अर्थाच ही सोपी गोष्ट नव्हती. यात एक आव्हान होते. उद्धव ठाकरे यांनी ते स्वीकारले. हे आव्हान स्वीकारण्यात त्यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासारखा पडद्यावरचा मोहरा आणि शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासाऱ्या राजकारणातील वस्ताद व्यक्तीमत्वाची साथ मिळाली. पद स्वीकारणे सोपे होते. पण खरी लढाई पुढेच होती.

टीका आणि संयम

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. काही तासही झाले नव्हते. अनपेक्षीतपणे पायउतार झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकात पाटील यांच्यासाख्या सहकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका कायम ठेवली. ही अभद्र युती आहे. हे सरकार म्हणजे तीन पायाची रिक्षा वैगेरे वैगेरे. राज्याती सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात बसावे लागल्याचा भाजपला बसलेला हामोठा धक्का होता. होणारी टीका मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सहन केली. त्याला अक्रमक प्रत्युत्तर दिले नाही. उलट संयत शब्दांत त्यावर भाष्य केले. आरेला कारे म्हणन्याचा स्वभाव. त्यामुळे शिवसैनिक प्रतिक्रिया देणार हे अपेक्षीत होते. परंतू, कोणत्याही शिवसैनिकांनी भाजपच्या टीकेवर लक्ष दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी इथेच आर्धी लढाई जिंकली होती.

ट्विट

निर्णय आणि कसोटी

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची खरी कसोटी होती शेतकरी कर्जमाफी निर्णयात. भाजप सोबत युती करुन निवडणूक लढलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करण्याचे अश्वासन दिले होते. कर्जमाफीच्या निर्णयाने ते पूर्ण नक्कीच झाले नाही. तरीही राज्याची एकूण अर्थव्यवस्था ध्यानात घेऊन महाविकास आघाडी सरकारने किमान 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ केले. त्यावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरचे कर्ज भरावे दोन लाख माफ होतील असे सांगितले. राज्याच्या तिजोरीतील पैसा आणि गेली अनेक वर्षे सादर होणारा तुटीचा अर्थसंकल्प विचारात घेता हे कठीण होते. तरीही या सरकारने हा निर्णय घेताला. त्यामुळे मुख्यमंत्री कसोटीवर उतरुणही निर्णय घेतात हा संदेश लोकांमध्ये गेला. (हेही वाचा, Coronavirus: जिवनावश्यक वस्तुंची दुकानं बंद राहणार नाहीत, नागरिकांनी गर्दी टाळावी - उद्धव ठाकरे)

ट्विट

ट्विट

प्रशासन आणि कारभार

महाविकास आघाडी सरकार त्यातही आजवर एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मुळातच वैचारिक मतभिन्नता असलेले हे पक्ष किमान समान कार्यक्रमाद्वारे एकत्र आले. त्यामुळे मतभेद होणे स्वाभाविक होते. असे असले तरी कोणत्याही मंत्र्याने अद्याप तरी थेट मुख्यमंत्र्याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. सर्व मंत्री आमदारांना निर्णयस्वातंत्र्य देऊन आणि वेळप्रसंगी विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेण्याचे तंत्र उद्धव ठाकरे यांनी जमवले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी जिव्हाळ्याचेच संबंध निर्माण केले आहेत. (हेही वाचा, Gudi Padwa 2020: स्वयंशिस्त, सहकार्यातून कोरोना संकटावर मात करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा)

ट्विट

ट्विट

कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिका कारभाराचा त्यांना अनुभव आहेच. शिवाय पक्ष प्रमुख म्हणूनही त्यांचा अऩुभव आणि कामगिरी चांगली राहिली आहे. तरीही मुख्यमंत्री म्हणून ते कारभार कसा करतात याबातब उत्सुकता होती. मात्र, प्रशासनावर आपला वचक निर्माण करुन उद्धव यांनी ते देखील करुन दाखवले. विधिमंडळात काम करणारे अनेक पत्रकार सांगतात आणि लिहितातही. उद्धव ठाकरे हे आठवड्यातील बराच काळ हे विधिमंडळात आपल्या दालनात घालवतात. राज्यातील विविध प्रश्न, समस्य, घटना, घडामोडी समजून घेतात. त्यामुळे सहाजिकच नोकरशाहीवर नियंत्रण राहिले.

ट्विट

ट्विट

कोरोना व्हायरस आव्हान आणि संदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. जी गोष्ट माहिती नाही त्याबाबत आगोदर माहिती करुन घेणे आणि मगच त्यात उतरणे. शक्यतो अभ्यास नसेल योग्य ते प्रशिक्षण नसेल तर त्यात उतरायचे नाही. (संदर्भ: ठाकरे विरुद्ध ठाकरे). जगावर कोरोना व्हायरस संकट आले. भारतही त्यातून वेगळा नव्हता. त्यामुळे जगभरात उडालेला हाहाकार पाहून राज्य सरकार अगोदरच जागे झाले. जनतेला घाबरुन न सोडता अत्यंत विश्वासाने कोरोना व्हायरसची दाहकता ध्यानात आणून दिली. जनतेशी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोणतेकी आकांडतांडव नाही. आरडाओरडा नाही. जे म्हणायचे ते नेमके आणि मोजक्या शब्दांत. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारे इव्हेंट करणे टाळले. त्यात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांची त्यांना चांगली साथ मिळाली. विशेष म्हणजे जनतेला योग्य प्रकारे संधेश जाईल यावर त्यांनी भर दिला.

ट्विट

ट्विट

कोराना व्हायरस संकट आण व्यवस्थापन

कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रभावी व्यवस्थापन करण्यावर भर दिल्याचे दिसते. सुरुवातीला जनतेला अवाहन करणे. त्यानंतर हळूहळू कायद्याचा अंमल करणे. तसेच, संबंधित मंत्र्यांना त्या त्या जबाबदाऱ्या वाटून देणे. महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगी बहुवाक्यता टाळणे. कारमाशिवया प्रसारमाध्यमांत चमकणे टाळणे यांसारख्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या. शक्य असूनही एका रात्रीत लॉकडाऊन करणे, जमावबंदी, संचारबंदी लागू करणे हे निर्णय टाळले. सोबतच राज्यातील आरोग्य विभाग, खासगी कंपन्या, कर्मचारी यांच्या थेट संपर्कात राहून आवश्यक ते व्यवस्थापन केले. त्यामुळे जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून विश्वास निर्माण करण्यात सध्यातरी उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. समाजमाध्यमांवरुनही उद्धव यांच्या निर्णयप्रक्रियेबद्दल चांगले लिहिले, बोलले जात आहे.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सज्ज झाली आहेत. कोरोना व्हायस नियंत्रणात आणण्यासाठी अद्याप कोणतेही औषध, लस अथवा प्रतिजैवक उपलब्ध नाही. त्यामुळे जगभरातील आनेक देशांची अपरिमीत हानी झाली आहे. भारतात हा व्हायरस तसा उशीरा दाखल झाला. त्यामुळे जगभरातील देशांचा अभ्यास करुन कोरोना विरोधात लढा देण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभा करण्यास भारताला अवधी मिळाला आहे. याचाच फायदा करुन घेत देशभरातील राज्य सरकारं आणि केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ यांसारख्या राज्यांनी आगोदरच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाचे आणि उपाययोजनांची दखल जागतिक आरोग्य संखटनेनेही घेतली आहे.