देशात आणि राज्यात लॉकडाऊन (Lockdown) असले तरी जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने कोणत्याही स्थितीत बंद राहणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्या दुकांनावर गर्दी करु नये. आज गुढीपाढव्याचा दिवस आहे. या शुभ दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण संयम राखून आणि एकत्र न येता घरी बसून कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा लढा यशस्वी जिंकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेला दिला आहे.
गुढी पाडवा (Gudi Padwa) आणि कोरोना व्हायरस संकटामुळे देश, राज्यात असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यंनी या आधी दोन वेळा जनतेला संबोधित केलेह होते. ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जनतेले उद्देशुन केलेले हे तिसरे भाषण होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्याच आपल्या संयत भाषणशैलीत जनतेला विश्वासात घेऊन विश्वास दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काल लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज दुपारी मी आपल्याला भेटायला येत आहे. मी मुद्दामच दुपारी आपणास भेटायला आलो आहे. कारण, रात्री लॉकडाऊनचा निर्णय झाल्यावर सकाळी सकाळी मी आलो असतो तर आपल्या छातीत उगीच धस्स झालं असतं. आज मी काहीही नकारात्मक बोलायला आलो नाही. तर, सकारात्मक विचार मांडायाला आलो आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत की, घरातील वातानुकुलीत यंत्रणा (एसी) नागरिकांनी बंद ठेवावी. घरातील थंड वातावरणाचा फायदा घेऊन विषाणू अधिक काळ तग धरु शकतात. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी शक्यतो एसी बंद ठेवा. यासोबतच कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. जिवानावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार आहेत. त्याुमुळे काळजी नसावी. (हेही वाचा, Gudi Padwa 2020: स्वयंशिस्त, सहकार्यातून कोरोना संकटावर मात करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा)
हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. लढवय्या महाराष्ट्र आहे. हे आपण कोरोना व्हायरस विरोधात लढा देऊन दाखवून देऊया, असे स्मरणही उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचे भाषण इथे पाहा
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/pzjUU8PxGS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 25, 2020
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या आधी कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला दोन वेळा संबोधित केले आहे. दोन्ही वेळेस त्यांनी आपल्या शांत आणि संयत भाषणात राज्यातील जनतेचा विश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना घाबरुन जाण्याचे कारण नाही. आपण या संकटावर मात करु शकतो असे सांगत जिवानावश्यक वस्तुंचा साठा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये असे अवाहनही केले. आपल्या भाषणातून त्यांनी जनतेला दिलासाही दिला. त्यामुळे आज पुन्हा संबोधित करताना मुख्यमंत्री कोणता निर्णय जाहीर करणार की आणखी काही विचार मांडणार याबाबत उत्सुकता होती.