Gudi Padwa 2020: स्वयंशिस्त, सहकार्यातून कोरोना संकटावर मात करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (Gudi Padwa Wishes) दिल्या आहेत. राज्यावर कोरोना व्हायरस संकट (Coronavirus Crisis) आहे. मात्र या संकटातून आपण स्वयंशिस्त, सहकार्यातून कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटावर मात करु असा विश्वास देत मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यंनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे घडते आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी नागरिकांनी स्वत:ला बंदिस्त करुन घेतले आहे. हिंदु परंपरेत गुढी पाडवा (Gudi Padwa) सणाला अत्यंत महत्त्व असते. कारण हिंदू पंचागानुसार गुढीपाडव्यापासूनच नव्या वर्षाची सुरुवात होते. नव्या वर्षाची सुरुवातच मुळी अशा वातावरणाने झाल्याने नागरिकांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकूण 3 ट्विट केली आहेत. आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे म्हणातात, ''आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी. स्वंयशिस्त व सहकार्यातून संकटावर मात करून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प करुया'.'

ट्विट

ट्विट

''गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते. यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच ऊंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे'' असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Gudi Padwa 2020: महाराष्ट्राचे उपामुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईत गुढी पाडवा सणाचं साधं सेलिब्रेशन! (Watch Video))

'तिसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, ''यातून प्रेरणा घेऊन आपणही कोरोना रुपी संकटावर मात करू. गर्दी न करता घरगुतीस्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच, यापुढेही शासनाच्या उपाययोजनांना कृतीशील साथ द्यावी अशी अपेक्षा.''

ट्विट

कोरोना व्हायरस संकट निवारणासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करुनही राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा तब्बल 112 इतका झाला आहे. तर देशातील कोरोना व्हायरस बाधितांचा संख्या 562 इतकी झाली आहे. त्यातील 40 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांचा अनुभव पाहता संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.