Coronavirus संकट काळात मुंबईकरांच्या मदतीस सरसावला सचिन तेंडुलकर, लॉकडाउनमध्ये 5000 कुटुंबांला एक महिन्याच्या रेशनची करणार मदत
सचिन तेंडुलकर लॉकडाउनमध्ये 5000 कुटुंबांला रेशनची करणार मदत (Photo Credit: Twitter/Getty)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण भारतात (India) थैमान घातले आहे आणि गेल्या 12 तासांत 547 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढून 6412 झाली आहे. कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन (Lockdown) आहे. अशा परिस्थितीत अनेक गरजू लोकांना अन्नाची समस्या भेडसावत आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पुढाकार घेतला आहे. तेंडुलकरने देशभरात कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान 'अपनालय' (Apnalaya) नावाच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत 5000 लोकांना मदत करण्याचे वचन दिले आहे. कोरोनामुळे संघर्ष करणाऱ्या लोकांना संपूर्ण महिनाभर रेशन उपलब्ध करुन देण्यासाठी तेंडुलकर खर्च करणार आहेत. यास्वयंसेवी संस्थेने ट्विटरवर जाऊन बातमीची पुष्टी केली आणि या दिग्गज फलंदाजाचे आभार मानले. सचिनने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुंबईच्या शिवाजी नगर आणि गोवंडी भागातील सुमारे पाच हजार लोकांना मदत करण्याचे वचन दिले आहे. (कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांना हार्दिक पंड्या ने केला सलाम, ट्विटर पोस्टद्वारे व्यक्त केला आदर)

"सचिन तेंडुलकर पुढाकार घेतल्याबद्दल आणि या लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त त्रास सहन करणाऱ्यांना मदत करण्यासाठी अपनालयाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तो एका महिन्यासाठी सुमारे 5,000 लोकांच्या रेशनची काळजी घेणार आहे. आपल्या समर्थनाची आवश्यकता असलेल्या बरेच व्यक्ती आहेत, लोकांनो! देणगी द्या, '' सचिनची कृतज्ञता व्यक्त करताना आणि इतरांनाही देणगी देण्याचे आवाहन करतांना अपनालय नावाच्या स्वयंसेवी संस्थेने ट्विट केले. 47-वर्षीय सचिननेही स्वयंसेवी संस्थेकडून दु:खी आणि गरजूंच्या सेवेचे आपले कार्य सुरू ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली. "आपले चांगले कार्य चालू ठेवा," असे त्याने ट्विट केले.

सचिनचे ट्विट

तत्पूर्वी, कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधानांनी आपत्कालीन परिस्थिती पीएम-केअर्स फंड आणि मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत दिली होती.

मुंबईत वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया च रूपांतर क्वारंटाईन विभागामध्ये : Watch Video

मास्टर ब्लास्टर लोकांना सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरात राहण्याचे आवाहन करीत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने देशभरात सुमारे 200 हुन अधिकचा बाली गेला आहे.