21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) देश झगडत असताना, संकटाच्या वेळी पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका चव्हाट्यावर आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपले काम नेहमीच उत्तम रीतीने बजावले आहे आणि पुढेही ते करत राहील. व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे (बंद) अनुसरण करण्यासाठीमुंबई पोलिसांनी लोकांसाठी व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि सर्वांना शटडाउनचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणूंच्या या संकटात मुंबई पोलिस मोठा काम करीत आहेत, ज्यासाठी चहुबाजूने त्यांची प्रशंसा केली जात आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) प्रत्येक नागरिक या व्हायरसच्या संकट काळात घरी राहावा यासाठी मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना सलाम केला. (Coronavirus: मुंबई पोलिसांच्या भावनिक व्हिडिओ ला पाठिंबा दर्शवत अजय देवगण आणि आलिया भट यांनी आपल्या फिल्मी अंदाजात दिला जनतेला मोलाचा संदेश)
हार्दिकने मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओ रिट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले,"आमचे रक्षण करणारे मुंबई पोलिस आणि देशभरातील इतर सर्व अधिकारी भरपूर प्रेम आणि शुभेच्छा". लॉकडाऊन दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांचे अनुकरणीय काम दाखविणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात दिवसभर पेट्रोलिंग आणि गस्त ड्युटीने थकलेल्या पोलिसांना 21 दिवस घरात रहाण्यास सांगितले तर ते काय करतील याबद्दल बोलत आहेत. काहीजण म्हणतात की ते कुटुंबासमवेत वेळ घालवतील, कोणी म्हणतो की तो चित्रपट पाहिलं, वाचन करेल.
Lots of love and wishes to @MumbaiPolice and all the other officials around the country serving to protect us 🙌 https://t.co/uo43PyCos7
— hardik pandya (@hardikpandya7) April 9, 2020
कोविड-19 चा क्रिकेटलाही फटका बसला आहे. तथापि, क्रिकेटपटू आणि अन्य संघटनांनी प्रादुर्भावाच्याविरूद्ध लढा देण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नुकतेच दिग्गज सुनील गावस्कर यांनी 59 लाख रुपयांची देणगी दिली आहे तर कसोटी नियमित चेतेश्वर पुजारानेही पीएम-केअर फंडमध्ये अज्ञात योगदान दिले आहे. कोविड-19 रोगाने भारतात 150 हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर आणि केदार जाधव यांनी महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आर्थिक पाठिंबा दर्शविला. युवराजने पीएम-केअर्स फंडला 50 लाख रुपयांची देणगी दिली. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि त्यांची पत्नी गीता बसरा जालंधरमधील 5000 कुटुंबांना रेशन पुरवण्याचे काम करीत आहे.