कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्वत्र थैमान घातले असून आतापर्यंत 4 हजार नागरिकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हारयस भारतात दाखल झाला असून महाराष्ट्रात 14 तर, संपूर्ण देशात 76 रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. परिणामी राज्य सेवा आयोगामार्फत ( MPSC) दर 3 वर्षांनी घेतली जाणारी आरटीओची (RTO) परिक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही करत आहे. येत्या 15 मार्च रोजी आरटीओची परिक्षा घेतली जाणार आहे. एकट्या पुण्यातून परिक्षेसाठी 40 हजार विद्यार्थी बसणार आहे. तर, राज्यात 96 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र, कोरोनाच्या रुग्णात वाढता प्रभाव पाहून ही परिक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पुण्यात आज आणखी एक करोना रुग्ण आढळला असून पुण्यातील करोना रुग्णांची संख्या 10वर गेली आहे. तर राज्यातील करोना रुग्णांचा आकडा 17वर गेला आहे. तसेच पुण्यात 311 रुग्ण देखरेखीखाली असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे. यामुळे येत्या 15 मार्च रोजी राज्य सेवा आयोगामार्फत घेतली जाणारी आरटीओची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. परीक्षा देण्यासाठी पुण्यात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला नकळत कोरोनाचा संसर्ग झाला आणि तो गावाकडे तसाच परत गेला तर, मोठी अडचण होऊ शकते. याशिवाय अशा परिस्थितीत ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर मोठा मानसिक तणाव निर्माण झाला आहे. हे देखील वाचा- पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण; शहरातील बाधित रुग्णांची संख्या 10 वर
नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबतीत मोठी घोषणा केली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणे जाण्याचे टाळावे, हस्तांदोलन नको किंवा वारंवार हात धुणे हे उपाय करावे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई नागपूर येथील मॉल, नाट्यगृह, स्विमिंग पूल आणि जिम बंद ठेवण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच मॉल आणि सिनेमागृहात जाणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअप व्हायरल झालेल्या अफवा याला कारणीभूत असल्याची आरोप केला जातोय. चिकन आणि अंडी खाल्यामुळे कोरोनाची लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायीकांवर झालाय अहमदनगर जिल्हात एका महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे