Deadly Coronavirus (Photo Credits: IANS)

पुण्यात (Pune) आणखी एका रुग्णाला कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Pune Divisional Commissioner Deepak Mhaiseka) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

आज नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. नागपूर शहरात कोरोनाचे एकूण 3 रुग्ण सापडले आहेत. नागपूरात पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - नागपूर मध्ये कोरोना व्हायरसचे दोन नवे रुग्ण; राज्यातील एकूण 17 जणांना लागण)

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 67 वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारपासून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात दोन दिवसांचे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन होणार होते. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघाने हे संमेलन पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे.