Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus)  पसरत चालले असून आज नागपूर (Nagpur) मध्ये कोरोनाचे आणखीन 2 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागपूर शहरात एकूण 3 जणांना तर राज्यभरात एकूण 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना 14 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली होती त्यानंतर आज पुन्हा 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. सद्य स्थितीला पुण्यात (Pune) सर्वाधिक म्हणजे 10 रुग्ण आढळले आहेत तर, त्यापाठोपाठ मुंबईत (Mumbai) 3, नागपूर मध्ये 3, आणि ठाण्यात  (Thane) एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत. तर अन्य संशयितांना सुद्धा देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारतात सुद्धा काल कर्नाटक येथे कोरोनामुळे एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हळूहळू देशात रुग्णानाची संखय 82  वर पोहचली आहे.अशावेळी खबरदारी म्ह्णून सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमू नये असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल सुद्धा पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई: Coronavirus च्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर Fake Biotol हॅन्ड सॅनिटायझर विकणार्‍या व्यक्तीला कांदिवली मध्ये अटक; FDA ची कारवाई

ANI ट्वीट

दरम्यान, वुहान म्हणजेच जिथून कोरोनाची पहिली लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते, तसेच आतापर्यंत या व्हायरसमुळे ज्याठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले आहेत तेथील परिस्थिती आता हळूहळू स्थिर होत आहे, मात्र याठिकाणहून अन्य देशांमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस आता चांगलेच हात पाय पसरताना दिसून येत आहे, चीन पाठोपठ आता इटली मध्ये सुद्धा कोरोनामुळे 1000  मृत्यू झाले आहेत.