महाराष्ट्रासह जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती पसरत आहे. दरम्यान आता या व्हायरसपासून बचावण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं याकडे नागरिकांचा कल आहे. पण या भीतीचा गैरफायदा घेत मुंबईमध्ये काही कंपनींकडून बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यात आले आहेत. नुकतीच त्यावर एफडीए (Food and Drugs Administration) कडून धाड टाकून हा काळाबाजार बंद करण्यात आला आहे. यामधून 3 लाख रुपयांचे हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्याचंदेखील हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तामधून समोर आले आहे. दरम्यान या फसवणूकीच्या धंद्यामध्ये एका व्यक्तीला कांदिवली भागातून अटक करण्यात आली असून आज (13 मार्च) दिवशी कोर्टामध्येही दाखल केले जाणार आहे. Covid-19: मुंबई महापालिकेने जाहीर केली कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची 12 मार्चपर्यंतची अधिकृत आकडेवारी.
Biotol असं या प्रोडक्टचं नाव असून सुमारे ₹1,15,000 माल जप्त करण्यात आला आहे. कांदिवली पाठोपाठ अजून ठिकाणी एफडीए कडून धाड टाकण्यात आली असून त्यामध्ये बनावट हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये Biotol आणि WIZ यांचे 1,78,800 रूपयांचे प्रोडक्ट्स आहेत. दरम्यान या बनावट हॅन्डसॅनिटायझर बनवणार्यांपैकी एकाही व्यक्तीकडे एफडीए अप्रुव्ह्ड लायसन्स नव्हते. मुंबई शहरामध्ये इतरही काही दुकानांमध्ये धाड टाकणार असून Ethanol Alcohol चे सोर्स काय असतील याची पाहणी केली जाणार असल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्यांनी HT शी बोलताना दिली आहे. दरम्यान एफडीएने ग्राहकांना केलेल्या आवाहनानुसार, प्रत्येकाने हॅन्ड सॅनिटायझर घेण्यापूर्वी लायसंस नंबर आणि पॅकेजिंग डेट पाहून घ्यावी.
#CoronaVirus : मुंबई में नकली सैनिटाइजर्स बरामद, बिना जांच धड़ल्ले से हो रही थी बिक्री#coronavirusinindia #CoronavirusPandemic #CoronaVirusUpdate @vinodjagdale80 @MumbaiPolice pic.twitter.com/hAKepOtJsu
— News24 India (@news24tvchannel) March 13, 2020
मुंबईच्या कस्तुरबा रूग्णलयामध्ये सध्या कोरोना व्हायरसचं निदान करण्यासाठी लॅब असून तेथेच 2 रूग्नांवर उपचार असून काल रात्री ठाण्यामध्ये एका रूग्णाला कोरोनाचं निदान झालं आहे. सध्या महाराष्ट्रात 14 कोरोनाग्रस्त असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वृद्धाची स्थिती चिंताजनक असून बाकी रूग्ण स्थिर आहेत.