कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत 4 हजार लोकांनी आपली जीव गमावला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतातही कोरोना बाधित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात मुंबई विमानतळावर तपासणी केलेले प्रवासी, कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलल्या रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांचाही अहवाल सादर केला आहे. मुंबई महानगर पालिकेने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात आतापर्यंत सुमारे 1,21,500 हजार नागरिकांना कोरोना व्हायरस बाधा झाल्याचा आकडा समोर आला आहे. जगभरात 4,300 नागरिकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच तब्बल 3,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. जगभरातील 144 देशांमध्ये कोरोना व्हायरस प्रादूर्भाव आहे. या विषाणूचे मुल्यांकन करताना जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस म्हणजे एक साथीचा आजार असल्याचे म्हटले आहे. हे देखील वाचा- Covid-19: अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितला राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा अधिकृत आकडा
मुंबई महानगर पालिकेचे ट्वीट-
कोरोनाव्हायरस संबंधित १२ मार्च, २०२० पर्यंतचे अधिकृत आकडे व अद्यावत माहिती.#कोरोना_ला_ना #NaToCorona #Coronavirus #CoronavirusUpdate pic.twitter.com/ZDAilglUkA
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 12, 2020
मुंबई महानगर पालिकेने ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केलेली माहिती खालीलप्रमाणे-
- दिनांक 18 जानेवारपासून मुंबई विमानतळावर एकूण 1 लाख 96 हजार 762 प्रवाशांची तपासणी केली आहे.
- दिनांक 12 मार्च 2020 पर्यंत कस्तुरबा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये 190 रुग्णांची भरती करण्यात आली आहे.
- आतापर्यंत तपासणी केलेल्या निगेटिव्ह रुग्णांची संख्या 168 आहे. तर, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 आहे.
कोरोना व्हायरस रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा अहवाल-
1) अति जोखिमचे निकट सहवासी
दिनांक 11 मार्च 2020 रोजी 3 निकट सहवासी विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.
2) कमी जोखीमचे सहवासी- वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचारी यांच्या 3 टीमने बुधवारी रात्री वस्तीपातळीवर सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, 106 घरांची तपासणी करण्यात आली असून ज्यामध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यात एक अति जोखिमचा निकट सहवासी आढळून आला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ज्या इमारतीमध्ये त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या 3 घरातील लोकांची त्यांच्या घरातच तपासणी करण्यात आली आहे.
सध्या 24 विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीम संशयीत रुग्णांचे सर्वेक्षण करत आहेत.
- दिनांक 12 मार्च 2020पासून 652 संशयितांचा 14 दिवसांचा पाठपुरवठा घेण्यात आला आहे.
- दिनांक 12 मार्च 2020 पर्यंत 649 प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरसचे लक्षणे दिसली आहेत.
- दिनांक 12 मार्च 2020 पर्यंत लक्षणे दिसणाऱ्या 3 संशियितांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह असल्याचे कळाले.
- दिनांक 12 मार्च 2020 पर्यंत 14 दिवसांचा पाठपुरवठा संपूर्ण झालेले व अधिशयन काल संपलेले एकूण 190 रुग्ण आहेत.
तसेच महानगर पालिकेने आपला हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. 1996 हेल्पलाईन नंबरवर 24 तास वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत माहिती दिली जात आहे.