coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशातील किंवा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग अधिक असलेल्या शहराबाबत विचराले असाल तर तुम्ही कदाचित मुंबई (Mumbai) किंवा पुणे (Pune) शहराचे नाव घ्याल. पण थांबा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा प्रादुर्भाव सर्वा अधिक असलेल्या शहराचे नाव आहे नाशिक (Nashik). होय, देशातील प्रती 10 लाख लोकसंख्येपाठीमागे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनुसार भारतातील चार शहरं ही प्रामुख्याने आघाडीवर आहेत. यात सर्वात पहिला नाशिक शहराचा क्रमांक आहे. त्यानंतर मग नागपूर, पुणे आणि मुंबई शहराचा समावेश आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली 9 व्या क्रमांकावर आहे. याशिवाय पहिल्या 10 मध्ये लखनऊ, बेंगळुरू, भोपाळ, इंदूर आणि पाटणा या शहरांचाही समावेश आहे.

देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. World Urbanization Prospects - Population Division च्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार पाठिमागील एक महिन्यापासून एका दिवसातील नाशिक शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची सर्वाधिक रुग्णसंख्या ही 3947 इतकी होती. नाशिकपाठोपाठ नागपूर, पुणे आणि मुंबई अशी क्रमवारी आहे.

नाशिक शहरात संपूर्ण महिन्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या 97,765 इतके रुग्ण आढळले. 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा पाहिला तर तो 46, 050 इतका किंवा त्याहीपेक्षा अधिक आढळतो. नाशिक शहरापाठोपाठ नागपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळलते. नागपूरमध्ये आढळलेल्या कोोरना रुग्णांची एका महिन्याती संख्या ही 1,34,840 इतकी आहे. प्रती 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा 45,856 इतका किंवा त्याही पेक्षा अधिक दिसतो. (हेही वाचा, PM Narendra Modi On Kumbh Mela 2021: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

नाशिक, नागपूर पाठोपाठ कोरोना आकडेवारीत समावेश होतो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे कॉस्मोपोलिटन शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचा. पुणे शहरात एका दिवसात सर्वाधिक आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 10,920 इतकी आहे. प्रती 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा 36,359 पेक्षाही अधिक आहे.

दरम्यान, मुंबई शहरात 16 मार्च ते 15 एप्रिल या काळात 3,70,000 इतके रुग्ण आढळून आले. मुंबईचा क्रमांक नाशिक, नागपूर, पुण्यानंतर लागतो. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा नक्कीच मोठा आहे. परंतू, प्रती 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत विचार करता मुंबई शहराचा क्रमांक हा नाशिक, नागपूर, पुणे नंतर येतो.