Coronavirus Highlights In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस, आकडेवारीसह दिवसभरातील 5 ठळक मुद्दे
Coronavirus Highlights In Maharashtra | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Highlights In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची आकडेारी वाढते आहे. आज दिवसभरात हाती आलेल्या शेवटच्या अद्ययावत आकडेवारीनुसार राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 29,100 इतकी झाली आहे. दरम्यान, कोरोना संक्रमितांच्या आकड्यांसोबत राज्यातील लॉकडाऊन काळात गुन्हे, पोलिसांवरील हल्ले, वाहतूक करणाऱ्या नागरिकांची संख्या (ई-पास), यांसह कोरोना व्हायरस संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यांबाबत आज दिवसभरात घडलेली महत्त्वपूर्ण माहिती आणि ठळक मुद्दे खालीलप्रमाणे. सदर माहिती आणि आकडेवारी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रातील गुन्हे

 • राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 7 हजार 256६ गुन्हे
 • 20 हजार 237 व्यक्तींना अटक.
 • अवैध वाहतूक करणाऱ्या 1304 वाहनांवर गुन्हे
 • 57 हजार 670 वाहने जप्त

क्वारंटाईन आणि वाहतूक

 • अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत 3 लाख 56 हजार 232 पास वितरित
 • राज्यातील Quarantine व्यक्तींची एकूण संख्या 3 लाख 31 हजार 151
 • Quarantine शिक्का असलेल्या 672 व्यक्तींना शोधून विलगीकरण
 • राज्यात 3932 रिलिफ कॅम्प, जवळपास 3 लाख 74 हजार 456 लोकांची व्यवस्था

(हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कोरोना व्हायरस संकटाच्या छायेत)

पोलिस दलात कोरोना व्हायरस संक्रमन आणि मृत्यू

 • coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील 24४ तास कार्यरत.
 • कोरोनाविरुद्धलढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या 127 पोलीस अधिकारी, 1026 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू.
 • मुंबई 6, पुणे 1,सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 9९ पोलीस वीरांना कोरोना मुळे गमवावा लागला जीव

पोलिसांची धडक कारवाई

 • अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत एका दिवासात 84 गुन्ह्यांची
 • नोंद, 45५ आरोपींना अटक तर 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. आतापर्यंत एकूण 5489 गुन्ह्यांची
 • नोंद, 2457 आरोपींना अटक तर 14 कोटी 93 लाखांचा मुद्देमाल जप्त.

33 जिल्ह्यांत 4 हजार 597 मद्य विक्री दुकाने सुरू

 • Lockdown कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत जारी केलेल्या सशर्त मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यांत 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी 4 हजार 597 दुकाने सुरू.
 • गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या कोरडे जिल्ह्यांसह काही जिल्ह्यांत मद्यविक्री बंद.

दरम्यान, भारतातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 81970 इतकी झाली आहे. त्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 51401 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2649 इतकी झाली आहे. तर उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने देशभरातून 27920 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.