राज्य सरकारने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत साहसी पर्यटन धोरणास (Adventure Tourism Policy) मान्यता दिली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कारवा पर्यटन धोरणास (Caravan Tourism Policy) परवानगी देण्यात आली होती. विशेषत: कोविड-19 संकटानंतरच्या (Covid-19 Pandemic) काळात राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पर्यटन धोरणा अंतर्गत विविध साहसी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. (Jail Tourism: महाराष्ट्रातील तुरुंग पर्यटनासाठी खुले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'येरवडा जेल' पासून सुरुवात)
ट्रेकिंग, सायकलिंग यांच्यासह अनेक खेळ सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यटन क्षेत्री राबवण्यात येणार आहेत. परंतु, यामध्ये इतर जंगल अॅक्टीव्हीटीजचा समावेश केलेला नाही. मात्र यातून साहसी खेळांना प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये वेगवेगळे डोंगर आणि घनदाट जंगले आहेत. तर कोकण भागामध्ये नद्या, समुद्र किनारे असल्यामुळे पाणी, जमिन आणि हवा या तिन्ही माध्यमातून अशा ठिकाणी वेगवेगळ्या साहसी पर्यटन खेळ राबवण्यात येऊ शकतील.
या कार्यक्रमातील रजिस्ट्रेशन, रेग्युलेशन, ट्रेनिंग, पाहाणी, प्रोमोशन या सारख्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना किंवा व्यक्ती यांना चांगली संधी मिळू शकते. सध्या राज्यामध्ये हायकिंग, ट्रेकिंग, फॉरेस्ट कॅम्प्स, जंगल सफारी, रॉक कॉल्म्बिंग, रिव्हर राफ्टिंग, पॅरागॅयडिंग, पॅरासिलिंग, बंजीजम्पिंग, हॉट एअर बुलन राईड्स आणि सेलिंग यांसारख्या अॅक्टीव्हीजसाठी मोजक्याच ऑरगनाजेशन्स आणि ठिकाणं उपलब्ध आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी हे खेळ खर्चिक आहेत.
कारवा पर्यटन धोरणानंतर साहसी पर्यटन धोरण हा प्रोजेक्ट सुद्धा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. अखेर या प्रोजेक्टला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे.