पालघर (Palghar) जिल्ह्यातील मुरबे (Murbhe) मधील चंद्रकांत तरे (Chandrakant Tare) या मच्छिमार्याचे रातोरात नशीब फळफळले आहे. 28 ऑगस्टला त्यांच्या जाळ्यात अंदाजे 157 घोळ मासे (Ghol Fish) आले. हे मासे विकून त्यांची कोट्यावधींची कमाई झाली आहे. चंद्रकांत तरे त्यांच्या मालकीची हरबा देवी बोट घेऊन मासेमारीसाठी काही हौशी तरूणांना घेऊन समुद्रात मच्छीमार बांधवांना घेऊन गेले होते. तरे यांनी मासेमारी करण्याकरिता वागरा पद्धतीचे जाळे समुद्रात सोडले. थोड्यावेळाने त्यांना ते जड लागले. त्यांनी जाळे वर खेचल्यानंतर त्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त मासे सापडले.
घोळ मासा हा अंदाके 18-25 किलो वजनाचे असतात, एका माशामध्ये 300-400 ग्राम वजनाची पिशवी (बोत) मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान लिलावात 1 कोटी 26 लाख रुपयांची बोत आणि मासे मिळून दीड कोटीहून अधिक रक्कम मच्छिमार चंद्रकांत तरे यांनी मिळलली. घोळ माश्याच्या पोटातील ही पिशवी वैद्यकीय कामासाठी वापरली जाते. त्याला औषधी गुणधर्म असल्याने विशेष किंमत मोजली जाते. माशातील कोलेजनचा वापर अनेक औषधामध्ये केला जातो. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकॉंग मध्ये हे मासे खास निर्यात केले जातात. भारतात हा सर्वात लहान घोळ मासा देखील 8-10 हजारात विकला जातो. फार्मा कंपनी या घोळ माशापासून dissolvable stitches देखील बनवतात. सिंगापूर मध्ये वाईन प्युरिफिकेशन मध्ये देखील त्याचा वापर केला जातो.
चंद्रकांत तरे यांच्यापूर्वी पालघर मधील मुरबे या गावातील श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या जाळ्यात देखील मोठे घोळ मासे अडकले होते. त्यामधील बोताची किंमत साडे पाच लाखापेक्षा अधिक होती. 22 ऑगस्टला नारळीपौर्णिमा झाल्यानंतर कोळी बांधवांनी आता हळूहळू पुन्हा मासेमारीला सुरूवात केली आहे. (नक्की वाचा: अमेरिकेच्या North Carolina मध्ये आढळला चक्क माणसांप्रमाणे दातांची रचना असलेला Sheepshead Fish).
दरम्यान टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना चंद्रकांत तरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या पैशातून त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर कमी होणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.