CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

CBI Investigation in Maharashtra: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सरकारने बुधवारी राज्यातील खटल्यांच्या चौकशीसाठी आता सीबीआयला (CBI) राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर सीबीआयने मंगळवारी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेशाच्या पोलिसांच्या हवाल्याने एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील रिपब्लिकन टीव्हीचा यामध्ये मोठा सहभाग असल्याचे म्हटले आहे.(TRP Scam: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला अटक, खात्यात मिळाली 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम)

टीआरपीचे प्रकरण यापूर्वी लखनौ मधील हजरतगंज येथील  पोलीस स्थानकता दाखल करण्यात आले. त्यात असे म्हटले की, जाहीरात करणाऱ्या कंपनीच्या प्रमोटर्सची तक्रार उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे दिली. हे प्रकरण ज्या वेळी उघडकीस आले जेव्हा काही चॅनल्स हे प्रेक्षकांना आमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करतात. जेणेकरुन त्यांच्या चॅनलचा टीआरपी वाढण्यास मदत होते असे BARC यांनी तक्रारीत म्हटले होते. त्याचसोबत नागरिकांना जबरदस्तीने त्यांचे चॅनल पाहण्यासाठी भाग पाडले जायचे. ऐवढेच नाही तर त्यांच्या घरात मीटर्स सुद्धा लावण्यात आल्याचे दिसून आले.(Fake TRP Racket: खोट्या टीआरपी रॅकेट प्रकरणी दोन जणांना अटक; रिपब्लिकन चॅनलचे नाव तपासात पुढे आल्याची मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची माहिती)

मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत टीआरपी प्रकरणी अधिक माहिती देत रिपब्लिक टीव्हीसह अन्य तीन चॅनल्सची नावे उघडकीस आणली. तर मुंबई पोलिसांकडून आणखी दोन आरोपींना मंगळवारी ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांचा खोट्या टीआरपी प्रकरणात सहभाग आहे. तर आतापर्यंत आठ जणांचा अटक करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे.

जाहिरातींचा दर टीआरपीच्या आधारावर ठरवला जातो. कोणत्या चॅनलला कोणत्या प्रकारे जाहिरात मिळणार हे ठरवले जाते. पण जर टीआरपीमध्ये काही बदल झाल्यास त्याच्या उत्पन्नावर मात्र परिणाम होते. परंतु काही जणांना याचा फायदा तर काहींचे नुकसान होते.टीआरपीची मोजणी करण्यासाठी एक BARC संस्था आहे. जी विविध शहरात बॅरोमीटर लावतात. देशात जवळजवळ 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत 10 हजार बॅरोमीटर लावले गेले आहेत. बॅरोमीटर इंस्टॉल करण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला दिले होते.