
Body Builder Jagdish Lad Passed Away: मराठमोठा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. जगदीश लाड याच्या मृत्यूमुळे बॉडीबिल्डर क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईत जगदीश लाड राहत होता. परंतु त्याने बडोदा येथे व्यायामशाळा सुरु केल्याने तो तेथेच होता. मात्र त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली.
लाड याने मिस्टर इंडियाचा दोन वेळा किताब ही जिंकला होता. त्याचसोबत कमी वयातच त्याने बॉडीबिल्डिंगमध्ये आपली कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचसोबत नवी मुंबईत महापौर श्रीचा किताब सुद्धा पटकावला होता. तर मुंबईत पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले होते.(Maharashtra: अहमदनगर येथे कोविडच्या रुग्णाकडे दुर्लक्ष, व्यक्तीचा महापालिका रुग्णालयातील स्ट्रेचरवर मृत्यू)
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, जर तुम्ही सुद्धा स्वत:ला फिट समजत असाल तरीही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घ्या. अन्यथा ही परिस्थिती तुमच्या जीवावर बेतू शकते. या व्यतिरिक्त नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्यासह नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.