
किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी मुंबई महापालिका (BMC) खासगी संस्थांच्या मदतीने डायलिसिस केंद्र (Dialysis Center) सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. या उपक्रमाची सुरुवात मुंबईतील भायखळा (Byculla) मधील झुला मैदान (Jhula Maidan) परिसरात मुक्ती फौज दवाखान्यात (Mukti Fauj Hospital) करण्यात आली. महापालिकेने एका खाजगी संस्थेला एक रुपया प्रतिचौरस मीटर या दराने 350 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत संस्थेकडून डायलेसिस केंद्र उभारणार आहे विशेष म्हणजे याठिकाणी फक्त 16 रुपयांत डायलिसिस सेवा उपलब्ध असणार आहे. हे केंद्र सकाळी आठ ते रात्री आठ अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे .
मटा दैनिकाच्या माहितीनुसार, मुक्ती फौज दवाखान्यात उभारण्यात आलेल्या डायलेसिस केंद्रामध्ये 25 डायलिसिस मशिन ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीचे पाच वर्ष ही जागा एक रुपया प्रतिचौरस मीटर अशा दराने 'सहारा एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल चॅरिटेबल ऑर्गनायझेशन' या संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेकडून 7.5लाख रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे . या केंद्रासाठी सुधार समितीने मंजुरी दिली असून, पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर हे केंद्र पुढील तीन महिन्यांत सुरू करणे संस्थेला बंधनकारक असेल. यात विलंब झाल्यास प्रत्येक आठवड्यासाठी संस्थेकडून पाच हजार रुपये दंड घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. (सुषमा स्वराज ठरल्या Cardiac Arrest च्या बळी; हार्ट अटॅक पेक्षा गंभीर असलेला हा आजार नेमका आहे काय?)
दरम्यान, केईएम हॉस्पिटलच्या नेफ्रॉलॉजी विभागाच्या शिफारशीनुसार 25 डायलिसिस मशिनसाठी 1 हजार ते 1200 लिटर क्षमतेच्या RO प्लॅन्टची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच, संस्था स्वखर्चाने वातानुकूलित यंत्रणेसह कर्मचारी व अन्य सुविधांचा पुरवठा करणार आहे.